Rohini Khadse Car Attack | रोहिणी खडसे यांच्या गाडीवर दगडफेक, अज्ञातांकडून हल्ला

रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुक्ताईनगरकडे येत असताना हा हल्ला करण्यात आला.

Rohini Khadse Car Attack | रोहिणी खडसे यांच्या गाडीवर दगडफेक, अज्ञातांकडून हल्ला
ROHINI KHADSE ATTACK
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 11:03 PM

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. हा वाद अजून संपलेला नाही तोच आता रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक करत हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुक्ताईनगरकडे येत असताना हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या गाडीची किरकोळ तोडफोड झाली असून रोहिणी खडसे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

मुक्ताईनगरकडे येत असताना अज्ञाताकडून हल्ला  

मिळालेल्या माहितीनुसार रोहिणी खडसे मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे हळदी समारंभात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. या कार्यक्रमाला हजेरी लावून त्या मुक्ताईनगरकडे आपल्या गाडीत परत येत होत्या. यावेळी त्यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने अचानकपणे हल्ला केला. यामध्ये रोहिणी खडसे प्रवास करत असलेल्या कारचा काच फुटला आहे. तर खडसे यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती देण्यात आलीय.

हल्ला नेमका कोणी केला ?

रात्रीच्या अंधारात हा हल्ला कोणी केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राणघातक हल्ला करून हल्लेखोराने पळ काढल्यामुळे त्याला पकडण्यात यश आलेले नाही. मात्र शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील आणि रोहिणी खडसे यांच्यातील वाद ताजा असताना ही घटना घडली आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून हल्लेखोराला लवकरात लवकर अटक करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.

हल्लेखोराचा तपास करुन कारवाई करा- रुपाली चाकणकर 

रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचे समजताच राष्ट्रवादीच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. तसेच अशा प्रकारचा हल्ला करणारे हल्लेखोर सुटता कामा नयेत असे म्हणत त्यांनी जळगाव पोलीस अधीक्षक यांच्याकडे हल्लेखोरांचा तपास करुन त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

इतर बातम्या :

UP Crime : उत्तर प्रदेशात नात्याला काळीमा, काकाने युवतीचे अपहरण करून 11 वर्षे लुटली अब्रू

Special Report | नितेश राणेंवरुन जाधव V/s फडणवीस खडाजंगी

Special Report | 280 कोटींच्या नोटांचं घबाड, नोटा पाहून अधिकाऱ्यांचे डोळेही विस्फारले

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.