Video: तलवार घेऊन ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न; कोल्हापूरातील कोवाडमधील प्रकार; सीसीटीव्हीत चोरट्यांचा घटनाक्रम कैद

चोरट्यांचा हा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तलवारी हातात घेऊन चोरटे बाजारपेठेत चोरीचा प्रयत्न करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याने व्यापाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.

Video: तलवार घेऊन ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न; कोल्हापूरातील कोवाडमधील प्रकार; सीसीटीव्हीत चोरट्यांचा घटनाक्रम कैद
कोवाडमध्ये ज्वेलर्स दुकाने तलावारी घेऊन फोडण्याचा प्रयत्नImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 7:46 PM

कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड (Kowad, Chandgad) येथील बाजारपेठेत मध्यरात्री चोरट्यांनी तलवारी घेऊन बाजारपेठेत दीड तास धुमाकूळ घातला. यावेळी तलवार घेतलेल्या दोघा चोरट्यांकडून दोन सोन्याच्या दुकानातून चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. श्रीराम ज्वेलर्स व नवरत्न ज्वेलर्स (Shri Ram Jewelers and Navratna Jewelers) दुकानांची कुलपे तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र चोरट्यांच्या या प्रयत्नात चोरट्यांच्या हाताला काहीही सापडले नाही. चोरट्यांचा हा सगळा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाला आहे.

चोरट्यांचा हा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तलवारी हातात घेऊन चोरटे बाजारपेठेत चोरीचा प्रयत्न करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याने व्यापाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.

ज्वेलर्समध्ये चोरीचा प्रयत्न

पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी पाठविण्यात आले आहे. श्रीराम ज्वेलर्स व नवरत्न ज्वेलर्समध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनाला आले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तलवारधारी चोरटे कैद झाल्याने चोरीची घटना समोर आली आहे.

तलवार घेऊन पेठगल्लीतील दुकानांची पाहणी

सीसीटीव्हीमध्ये गुरुवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास दोघे चोरटे दुचाकीवरून शिवाजी चौकात येतात. त्यानंतर ते माऊली मंदिराकडे अंधारात गाडी लावतात व हातात तलवार घेऊन पेठगल्लीतील दुकानांची पाहणी करतात.

लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न

यावेळी ग्रामपंचायत इमारतीलगत श्री राम ज्वेलर्सच्या दारात हातात तलवार घेऊन एकजण देखरेख ठेवतो तर दुसरा लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडतो. हा त्यांचा प्रयत्न वीस मिनिटे सुरू असतो. या दरम्यान बाजारपेठेतून गाडी निघून जाते, त्यावेळी ते लपून बसतात. त्यानंतर पुन्हा शटरचे दोन्ही बाजूचे कुलूप तोडतात मात्र यावेळी त्यांना सेंटर कुलूप तोडता आले नसल्याने गाडीकडे निघून जातात. त्यानंतर ते दोघे थोड्यावेळाने पुन्हा येतात आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर तोडून पुन्हा चोरीचा प्रयत्न करतात. त्यांचा हा प्रयत्नही यशस्वी होत नसल्याने त्यानंतर ते नवरत्न ज्वेलर्सकडे मोर्चा वळवितात.

दीड तास चोरट्यांचा वावर

शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करतात; यावेळी दुकानात साहित्य नसल्याने त्यांच्या हाती या चोरीच्या प्रयत्नात काहीच सापडत नाही. या सीसीटीव्हीमध्ये बाजारपेठेत असलेला तब्बल दीड तास चोरट्यांचा वावर आढळला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा सुगावा काढण्याची मागणी होत आहे. या घटनेमुळे चंदगड तालुक्यातही खळबळ उडाली आहे. त्यामुळे अशा प्रकरणाकडे पोलिसांनी लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.