आमदार संतोष बांगर पुन्हा वादात, कमचोरपणाची ‘ती’ ऑडियो क्लिप व्हायरल

Hingoli MLA Santosh bangar | आमदार संतोष बांगर आणि वाद हा प्रकार सुरु असतो. मागे हॉस्पिटलच्या बिलावरून एका डॉक्टरला धमकी दिल्याचा ऑडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर शासकीय अधिकाऱ्याशी झालेला वाद चर्चेत आला होता. आता एक नवीन ऑडिओमुळे आमदार संतोष बांगर पुन्हा चर्चेत आले आहेत.

आमदार संतोष बांगर पुन्हा वादात, कमचोरपणाची 'ती' ऑडियो क्लिप व्हायरल
Follow us
| Updated on: Nov 24, 2023 | 11:43 AM

हिंगोली, दि. 24 नोव्हेंबर | शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि वाद हे समीकरण अनेक वेळा घडून आले आहे. आमदार संतोष बांगर यांनी काही महिन्यांपूर्वी एका खानावळी चालकाला शिविगाळ केली होती. तसेच त्याच्या कानशिलात लगावली होती. हा वाद चांगलाच रंगला होता. त्यानंतर कृषी अधिकाऱ्याशी झालेला वाद चर्चेत आला होता. हॉस्पिटलच्या बिलावरून एका डॉक्टरला धमकी दिल्याचा ऑडिओ मध्यतंरी व्हायरल झाला होता. आता एक नवीन ऑडिओमुळे आमदार संतोष बांगर चर्चेत आले आहे. हा ऑडिओ शिवसेना ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पौळ पाटील यांनी एक्सवर टाकला आहे. या ऑडिओची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.

काय आहे ऑडिओ

हिंगोली आमदार संतोष बांगर आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांमधील संवाद अयोध्या पौळ पाटील यांनी व्हायरल केला आहे. काय रे सर्वजण माझ्या लाडक्या #गद्दार दादुड्याचा आवाज विसरले का? तर मग ऐका…..कामचोरपणा कसा करावा हे शिकवणारे गद्दार लोकप्रतिनिधी व लाईनमन यांचे संभाषण…. असे लिहित अयोध्या पौळ यांनी हा संवाद ट्विट केला आहे. संवादात आमदार संतोष बंगार यांनी यापुढे तू गावकऱ्यांना सांगून दे, माझ्याने काम होत नाही, मी तुमचे गाव सोडत आहे, असे म्हणताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

काय झाला संवाद

लाईनमन बोलत आहे. चव्हाण साहेबांचा फोन आला होता. तुम्ही सांगितल्यामुळे ते गाव घेतले आहे. मोठी कामे तुमच्यापर्यंत आली तर आम्ही हक्काने करतो. पण किरकोळ कामे तुमच्याकडे येत आहे. फ्यूज गेला, यासाठी हिवऱ्यासारखे गावातील लोक, डांगे कंपनी तुम्हाला फोन करत असतील कसे करावे. या गोष्टींमुळे मी ते गाव घेत नव्हतो. आता सीझन सुरु झाल्यावर जास्तच त्रास होत आहे. त्यावर आमदार बांगर म्हणतात की, आता तू जा आणि त्यांना सांग, मी हे काम करतो. पण माझ्याने यापुढे ही कामे होणार नाही. मी तुमचे गाव सोडून देत आहे. एकादा तू असे गावकऱ्यांना बोलून ये, असा सल्ला आमदार देत असल्याचे ऑ़डिओतून दिसून येत आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.