औरंगाबादः आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Elections) इतर पक्षांसोबत युती किंवा आघाडी करणार का, या विषयावर वंचित बहुजन आघाडीची (Vachit Bahujan Aghadi) महत्त्वपूर्ण बैठक आज औरंगाबादमध्ये पार पडली. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची ही बैठक झाली. यात निवडणुकांसंदर्भात निर्णय झाला. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर पक्षासोबत युती आघाडी (Aghadi) करण्यासंदर्भात जिल्हाध्यक्ष व त्या जिल्ह्याचे प्रभारी यांनी स्थानिक पातळीवर घेतील. स्थानिक पक्षाशी चर्चा करून युती-आघाडी करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य कार्यकारणी समोर ठेवावा असा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केला. औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून पक्ष यापुढे महाराष्ट्रात नव्या जोमाने सर्व निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी सांगितले.
सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात राहून दैनंदिन अडचणीत धावून जाणाऱ्या कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी मानून पक्ष यापुढे संघटनात्मक बांधणी साठी मैदानात उतरणार आहे. संघटनात्मक ऊर्जा व नियोजन यांची सांगड घालून पक्ष आता रचनात्मक काम घेऊन सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणार आहे, असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं
महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपच्या सत्ता हस्तगत करण्याच्या भानगडीत महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रश्न जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्या जात आहेत. याकडे काँग्रेस लक्ष द्यायला तयार नाही किंवा राष्ट्रवादी लक्ष द्यायला तयार नाही. अशा परिस्थितीत कोरोना नंतरची महाराष्ट्रातली परिस्थिती अतिशय भयावह आहे. वाढती महागाई रोजगाराचा बोजवारा वाजला शिक्षणाचा खेळखंडोबा झाला तरुणांना दिशाहीन केल्या जात आहे. नको त्या प्रश्नांवर तरुणांची माथी भडकवली जात आहेत. भांडवलदार आणि उद्योगपतींना जवळ करून सर्व स्तरावरच्या प्रशासकांमार्फत महाविकास आघाडीचे लोक आपली स्वतःची घर भरत आहेत आणि जनतेच्या पैशाची लूट करत आहेत. अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडी ने आता कंबर कसून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर मजबुतीने लढण्याचा निर्धार केला आहे, असेही अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
सध्या महाराष्ट्रात पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये त्याग, निष्ठा, श्रम आणि जिद्द या सूत्रावर आधारित जर कार्यक्रम सुरू केला तर पक्ष सत्तेत जायला वेळ लागणार नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधताना सांगितलं. याचाच भाग म्हणून पक्षाने नियुक्त केलेले सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांमध्ये सुसंवाद व समन्वय घडवून आणावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रस्थापित धर्मवादी आणि जातीवादी पक्षांनी जी वंचितांची राजकीय लढाई संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याला तोडीस तोड उत्तर देऊन सर्वसमावेशक जनाधार वाढेल, अशी भूमिका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज औरंगाबाद मध्ये झालेल्या वंचित बहुजन आघाडी च्या राज्य कार्यकारिणीत मांडली. याप्रसंगी राज्यातील अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली पक्षांतर्गत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले महत्वाचे धोरण निश्चित करण्यात आले नियोजन व रणनीती ठरविण्यात आली कामाची विभागणी करण्यात आली महाराष्ट्रातील सर्वसामान्य