बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम ‘जैसे थे’ ठेवा, औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

न्यायालयाने कामाची पाहणी केली आणि अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. अहवालानंतर औरंगाबाद खंडपीठ पुढील निर्णय देणार आहे. (Aurangabad Balasaheb Thackeray Memorial )

बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम 'जैसे थे' ठेवा, औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 9:11 AM

औरंगाबाद : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम (Balasaheb Thackeray Memorial) तूर्तास ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. औरंगाबादेतील महात्मा गांधी कॅम्पसमधील प्रियदर्शनी उद्यानामधील अनेक झाडं तोडून स्मारक उभं करण्याची योजना आहे. (Aurangabad bench orders Balasaheb Thackeray Memorial construction to keep as it is)

औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील देशमुख आणि न्यायमूर्ती आहुजा यांनी दिले आहेत. प्रियदर्शनी उद्यानातील झाडं तोडून स्मारक उभं करण्याच्या योजनेला अनेक पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवला होता. प्रियदर्शनी बचाव मोहीम सुरु करण्यात आली होती. याची दखल घेत  न्यायालयाने कामाची पाहणी केली आणि अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. अहवालानंतर औरंगाबाद खंडपीठ पुढील निर्णय देणार आहे.

झाडे गेली कुठे?

प्रियदर्शनी उद्यानातील 1215 झाडे गेली कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. वृक्षतोड रोखण्यासाठी याआधी जनहित याचिका दाखल केलेली होती. बांधकाम करत असताना मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते परंतु याचे पुनर्रोपण केले जात नसल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिले होते.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविषयीची माहिती

प्रकल्पाचा एकूण खर्च – 64 कोटी उद्यानाचा परिसर – 17 एकर पुतळ्यासाठी जागा – 1 हजार 135 चौरस मीटर फूड पार्कसाठी जागा – 2 हजार 330 चौरस मीटर म्युझियमसाठी जागा – 2 हजार 600 चौरस मीटर ओपन एअर स्पेस – 3 हजार 690 चौरस मीटर

प्रियदर्शनी उद्यानातील झाडं कधी-कशी कमी झाली?

12 जानेवारी 2016 – उद्यानात 9 हजार 885 झाडांची नोंद 30 नोव्हेंबर 2019 – उद्यानात 8 हजार 970 झाडांची नोंद कमी झालेल्या झाडांची संख्या – 1 हजार 225 झाडे

(Aurangabad bench orders Balasaheb Thackeray Memorial construction to keep as it is)

उद्धव ठाकरेंकडून घोषणा

2025 साली बाळासाहेबांच्या प्रखर राष्ट्रवादी ज्वलंत हिंदुत्वाची प्रेरणा देणारं स्मारक उभारणार आहोत, हिंदुत्ववादी म्हणजे राष्ट्रीयत्व सांगणारे हे स्मारक असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी डिसेंबर २०२० मध्ये केली होती. ज्यांची ओळख रिमोट कंट्रोल म्हणून होती, त्यांच्या स्मारकाचं उद्घाटन रिमोट कंट्रोलनेच होणं हा योगायोग आहे. या स्मारकात नुसता पुतळा नसेल तर या स्मारकातून अनेकांना हिंदुत्वाची प्रेरणा मिळेल, असं भव्यदिव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, आरे कॉलनीतल्या मेट्रो कारशेडला वृक्षतोडीवरुन स्थगिती देणाऱ्या शिवसेनेवर दुटप्पीपणाचा आरोप करण्यात आला आहे. औरंगाबादमधील 17 एकरचे प्रियदर्शिनी उद्यान आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या औरंगाबाद महापालिकेत या परिसरातील झाडांची कत्तल झाल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

संबंधित बातम्या :

बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक कधी होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात…

गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकासाठी झाडे तोडण्यास औरंगाबाद महापालिकेचा नकार

(Aurangabad bench orders Balasaheb Thackeray Memorial construction to keep as it is)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.