औरंगाबादेत कोरोनाचा कहर, दिवसाच्या सुरुवातीलाच 17 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 494 वर

औरंगाबादमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे (Aurangabad Corona Update). औरंगाबादेत आज ( 9 मे) दिवसाच्या सुरुवातीलाच कोरोनाचे 17 नवे रुग्ण आढळले आहेत.

औरंगाबादेत कोरोनाचा कहर, दिवसाच्या सुरुवातीलाच 17 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 494 वर
Follow us
| Updated on: May 09, 2020 | 9:39 AM

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे (Aurangabad Corona Update). औरंगाबादेत आज ( 9 मे) दिवसाच्या सुरुवातीलाच कोरोनाचे 17 नवे रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे काल दिवसभरात औरंगाबादमध्ये 100 पेक्षाही जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे औरंगाबादमधील कोरोनाबाधितांचा आकडा तब्बल 494 वर पोहोचला आहे. औरंगाबादेतील निवासी वैद्यकीय अधिकारी महेश लड्डा यांनी याबाबतची माहिती दिली (Aurangabad Corona Update).

औरंगाबादेत 1 मे रोजी 39 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 2 मे रोजी औरंगाबादेत आणखी 23 नव्या रुग्णांची भर पडली. त्यानंतर 3 मे रोजी 17 रुग्ण, 4 मे रोजी 47 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर 5 मे रोजी 24 नवे रुग्ण, 6 मे रोजी 28 रुग्ण, 7 मे रोजी 17 रुग्ण आणि 8 मे रोजी तब्बल 100 पेक्षाही जास्त रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गेल्या 8 दिवसात एकट्या औरंगाबादेत जवळपास 300 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

औरंगाबादमध्ये 15 मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. या रुग्णानंतर बाधितांचा आकडा हळूहळू वाढू लागला. दीड महिन्यात 53 रुग्ण आढळले. मात्र, गेल्या 15 दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. हा आकडा थेट पाचशेच्या घरात पोहोचला. त्यामुळे चिंता वाढली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे.

तारीख – रुग्ण 

  • 1 मे – 39
  • 2 मे – 23
  • 3 मे – 17
  • 4 मे – 47
  • 5 मे – 24
  • 6 मे – 28
  • 7 मे – 17
  • 8 मे  – 100 पेक्षा जास्त

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आकडा 19 हजारांच्या पार

राज्यातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस आणखी घट्ट होत चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तरीही राज्यातील कोरोनाचं संकट अद्याप नियंत्रणात आलेलं नाही. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 19 हजार 063 वर पोहोचली आहे. राज्यात काल (8 मे) दिवसभरात 1 हजार 089 नवे कोरोना रुग्ण आढळले.

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी :

Edit
जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 12142 374 462
पुणे (शहर+ग्रामीण) 2048 125 136
पिंपरी चिंचवड मनपा 125 3
ठाणे (शहर+ग्रामीण) 825 36 10
नवी मुंबई मनपा 716 4
कल्याण डोंबिवली मनपा 284 3
उल्हासनगर मनपा 15 0
भिवंडी निजामपूर मनपा 21 2
मीरा भाईंदर मनपा 192 2
पालघर 46 1 2
वसई विरार मनपा 194 9
रायगड 81 5 1
पनवेल मनपा 132 2
नाशिक (शहर +ग्रामीण) 107 2 0
मालेगाव मनपा 450 12
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 53 16 2
धुळे 32 3
जळगाव 96 1 14
नंदूरबार 19 1
सोलापूर 185 10
सातारा 94 3 2
कोल्हापूर 16 2 1
सांगली 35 27 1
सिंधुदुर्ग 5 1 1
रत्नागिरी 17 2 1
औरंगाबाद 423 14 12
जालना 12 0
हिंगोली 58 1 0
परभणी 2 1
लातूर 25 8 1
उस्मानाबाद 3 3 0
बीड 1 0
नांदेड 32 2
अकोला 121 1 10
अमरावती 80 11
यवतमाळ 95 8 0
बुलडाणा 24 8 1
वाशिम 1 0
नागपूर 212 12 2
भंडारा 1 0
गोंदिया 1 1 0
चंद्रपूर 4 1 0
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 34 8
एकूण 19063 3470 731

संबंधित बातम्या :

नागपूरकरांनो प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर पडल्यास थेट विलगीकरण कक्षात रवानगी, तुकाराम मुंढेंचे आदेश

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.