AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेहबुब शेख यांच्या अडचणी वाढल्या, बी समरी रिपोर्ट रद्द, बलात्कार प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे न्यायालयाचे आदेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष मेहबूब शेख यांना कोर्टाने दणका दिला आहे. बलात्कार प्रकरणातील बी समरी रिपोर्ट औरंगाबादच्या जिल्हा सत्र न्यायालयाने रद्द केला असून बलात्कार प्रकरणी पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

मेहबुब शेख यांच्या अडचणी वाढल्या, बी समरी रिपोर्ट रद्द, बलात्कार प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे न्यायालयाचे आदेश
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 9:52 PM

औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष मेहबूब शेख यांना कोर्टाने दणका दिला आहे. बलात्कार प्रकरणातील बी समरी रिपोर्ट औरंगाबादच्या जिल्हा सत्र न्यायालयाने रद्द केला असून बलात्कार प्रकरणी पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हे आदेश देताना न्यायालयाने पोलिसांवरही ताशेरे ओढले आहेत. (aurangabad district sessions court quashed b summary report of mahebub shaikh accused rape case)

न्यायालयाने काय आदेश दिले ?

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर एक बलात्काराराच गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच बलात्काप्रकरणी शेख अडचणीत आलेले आहेत. सध्या या प्रकरणआवर औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणी आज न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले. न्यायालयाने मेहबुब शेख यांच्यावर आरोप करण्यात आलेल्या बलात्कार प्रकरणातील बी समरी रिपोर्ट रद्द केला आहे. तसेच या बलात्कार प्रकरणाचा पुन्हा एकदा तपास कारा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पोलिसांवर ताशेरे ओढले

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब ईब्राहिम शेख याच्यावर अत्याचार प्रकरणी दाखल गुन्ह्यात काहीही तथ्य नसल्याचा पाेलिसांनी दिलेल्या बी समरी अहवालावरून न्यायालयाने पोलिसांना चांगलेच झोडपले. हा बी समरी अहवाल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सचिन न्याहारकर यांनी फेटाळला.

हा तर तक्रारकर्तीला खोटे पाडण्याचा डाव

या प्रकरणात राजकीय दबावाखाली तपासी अधिकाऱ्यांनी तपास केल्याचे दिसत आहे. फिर्यादी तथा पीडितेच्या म्हणण्याऐवजी आराेपीच्या म्हणण्यानुसार  तपास करण्यात आला. तसेच फिर्यादीलाच या प्रकरणात खाेटे ठरवण्याचा प्रयत्न केलेला दिसत असून याप्रकरणात आता सिडकाे पाेलीस ठाण्याचे निरीक्षकांनी तपास करून पाेलीस आयुक्तांनी यामध्ये याेग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन करावे, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे. तसेच पाेलिसांनी दिलेला बी समरी अहवालात सहायक सरकारी वकील जयमाला राठाेड यांनी याेग्य ते पुरावे जाेडलेले नसून स्वीकारणे याेग्य नाही. त्यामुळे हा अहवाल रद्द करावा, असे न्यायालयात सांगितले.

पोलिसांना घटनेवर शंका

पाेलिसांनी तपास करून या प्रकरणात कुठलेही तथ्य नसून पीडिता आणि आराेपी यांची भेट झाल्यावरही शंका उपस्थित केली हाेती. सीसीटीव्हीतही दाेघे कुठे भेटल्याचे दिसत नाही, असे पाेलिसांनी सांगितले हाेते. त्यावरून पाेलिसांकडून बी समरी अहवाल सादर करण्यात आला असून न्यायालयाने वरील मुद्दे उपस्थित करून फेटाळला.

काय आहे प्रकरण

सहायक पाेलीस आयुक्त निशिकांत भुजबळ यांनी बी समरी अहवाल न्यायालयात सादर केला आहे. याप्रकरणी पीडितेने आपले म्हणणे मांडण्यासाठी ॲड. आय. डी. मनियार यांच्यामार्फत अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब ईब्राहिम शेख (रा. शिरूर जि. बीड) यांच्याविरुद्ध 28 डिसेंबर 2020 राेजी सिडकाे पाेलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 29 वर्षीय पीडित तरुणी उच्च शिक्षित आहे. नाेकरीचे आमिष दाखवून मुंबईला नेण्यासाठी म्हणून 14 नाेव्हेंबर 2020 राेजी रात्री शेख यांनी कारमध्येच अत्याचार केला. आपण प्रतिकारही केला. मात्र, ताेंड दाबून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडितेने केलेले आराेप मेहबूब शेख यांनी समाजमाध्यमावरून प्रतिक्रिया देत फेटाळले हाेते.

मेहबूब शेख कोण आहेत?

मेहबुब शेख हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत

मुळचे बीड जिल्ह्यातील शिरुर कासार इथले रहिवासी

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभर परिचय

मेहबूब शेख यांचा खुलासा

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर शेख यांनी याबाबत खुलासा केला होता. त्यांनी म्हटले होते की, “औरंगाबादमधील सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मला पत्रकार मित्राकडून मिळाली. त्यानंतर मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आणि फिर्यादीच्या म्हणण्याप्रमाणे मेहबूब इब्राहिम शेख या व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी केली. मी कधीही संबंधित तरुणीला प्रत्यक्ष भेटलो नाही किंवा फोनवरही बोललेलो नाही. मी 10 आणि 11 तारखेला मुंबईत होतो. माझे मुंबईत कार्यक्रम होते. 14 नोव्हेंबरला मी बीड जिल्ह्यातील शिरुर कासार या माझ्या गावाकडे होतो. पोलिसांना सर्व पुरावे तसंच माहिती देण्यास मी तयार आहे. या प्रकरणामागे कोण आहे?, याचा पोलिसांनी शोध घ्यावा,” असं शेख यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, मेहबूब शेख यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर याबाबत एक व्हिडीओ शेअर करत संबंधित तरुणीने केलेले सगळे आरोप फेटाळून लावले होते. “संबंधित तरुणीशी माझा कसलाही संबंध नाही. मी तिला कधीही पाहिलं नाही किंवा भेटलेलो नाही. एखाद्या व्यक्तीने एवढ्या मेहतीने उभं केलेलं राजकीय आयुष्य इतक्या घाणेरड्या आरोपांनी उद्ध्वस्त करु नये. यामागे कुणाचं षडयंत्र आहे?, या प्रकरणामागे कोण राजकीय लोकं आहेत?, त्या महिलेचा बोलविता धनी कोण आहे?, याची पोलिसांनी कसून चौकशी करावी. गरज पडली तर माझी नार्को टेस्टचीही तयारी आहे आणि जर आरोप सिद्ध झाले तर मी फासावर जायला तयार आहे”, असं मेहबूब यांनी फेसबुक व्हिडीओ शेअर करत म्हटलं होतं.

इतर बातम्या : 

Municipal Election 2022 : तीन सदस्यीय प्रभाग पद्धत; पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर!

परीक्षा महाराष्ट्रासाठी, सेंटर उत्तर प्रदेश ! आरोग्य विभागाच्या भरती प्रकियेचा गोंधळ सुरुच, विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच

डोंबिवलीची घटना ताजी असताना कल्याणमध्ये आठ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना

(aurangabad district sessions court quashed b summary report of mahebub shaikh accused rape case)

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.