Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Gram Panchayat Election Results 2021: औरंगाबादमध्ये महिलांचा विक्रम, पूर्ण 9 जागांवर विजय

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात ढाकेफळ ग्रामपंचायतीमध्ये हा निकाल लागला असून गावात एकच जल्लोष पाहायला मिळत आहे.

Aurangabad Gram Panchayat Election Results 2021: औरंगाबादमध्ये महिलांचा विक्रम, पूर्ण 9 जागांवर विजय
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 11:09 AM

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील ढाकेफळ गावात महिलांनी विक्रम केला आहे. हाती आलेल्या निकालांनुसार, गावातील 9 पैकी 9 जागांवर फक्त महिलाच विजयी झाल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात ढाकेफळ ग्रामपंचायतीमध्ये हा निकाल लागला असून गावात एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. गावकऱ्यांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात महिलांना संधी दिली होती. त्यामुळे हा विक्रम पाहायला मिळत आहे. (Aurangabad Gram Panchayat Election Results 2021 Women record in Aurangabad won on 9 seats )

औरंगाबादेत महाविकास आघाडीने खातं खोललं आहे. आघाडीने आडगाव ग्रामपंचायतीत विजय मिळवला आहे. आगडगाव येथील 11 पैकी तब्बल 10 जागांवर विजय मिळवीत बहुमताने निवडणकू जिंकली आहे. राज्यात 16 जानेवारी रोजी ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. त्यानंतर आता संपूर्ण राज्यात मतमोजणी होत आहे. औरंगाबादेतही मतदान मोजणीकेंद्रांसमोर स्थानिक पुढाऱ्यांनी गर्दी केली असून यंदाचा विजयाचा गुलाल कुणाचा असेल याची उत्सुकता लागली आहे.

यातच औरंगाबादेतील आडगाव ग्रामपंचायतीचा निकाल समोर आला आहे. येथे महाविकास आडीचा विजय झाला असून जिल्ह्यात महाविकास आघाडीने खातं खोललं आहे. येथे महाविकास आघाडीने एकूण 11 जागांपैकी तब्बल 10 जागांवर विजय विजय मिळवला आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या निकालापैकी आडगावच्या माध्यमातून महाविकास आघाडीन खातं खोलल्यामुळे येथे जल्लोष साजरा होतोय. येथील निडणूक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिष्ठेची केली होती. आज दुपारपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व निकाल स्पष्ट होतील. मात्र, महाविकास आघाडीने पहिलाच विजय मिळवल्यामुळे आडगावमध्ये महाविकास आघाडीकडून आंनद साजरा केला जातोय.

दरम्यान राज्यातील 12,711 ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीतून एकूण 2 लाख 14 हजार उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. ग्रामीण भागाच्या राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी 80 टक्के मतदान झाले. एकूण 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. 1523 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यात 26,178 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. एकूण 46,921 प्रभागांमध्ये निवडणूक पार पडली. (Aurangabad Gram Panchayat Election Results 2021 Women record in Aurangabad won on 9 seats )

संंबंधित बातम्या :

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE | राज्यातील 10 मोठे निकाल, कुठे कोण जिंकलं?

अहमदनगर ग्रामपंचायत निकाल 2021 : आण्णा हजारे, पोपटराव, विखे, थोरात, रोहित पवार, राम शिंदेंची प्रतिष्ठा पणाला

निवडणुकीचे प्रत्येक अपडेट लाईव्ह LIVETV

(Aurangabad Gram Panchayat Election Results 2021 Women record in Aurangabad won on 9 seats )

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.