कौटुंबिक कलहाला कंटाळून औरंगाबादेत विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

पैठण तालुक्यातील गेवराई तांडा गावाशेजारी असलेल्या पडक्या विहिरीत महिलेने दोन्ही मुलांसोबत उडी घेतली. ( Aurangabad Married Lady commits Suicide)

कौटुंबिक कलहाला कंटाळून औरंगाबादेत विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या
औरंगाबादेत महिलेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 8:23 AM

औरंगाबाद : कौटुंबिक कलहाला वैतागून औरंगाबादेत विवाहितेने दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पडक्या विहिरीत उडी घेऊन महिलेने लेकरांसह आयुष्य संपवलं. पैठण तालुक्यातील गेवराई तांडा गावात ही घटना घडली. (Aurangabad Married Lady commits Suicide with two children)

वैशाली थोरात यांनी दोन चिमुकल्यांना सोबत घेऊन आत्महत्या केली. गावाशेजारी असलेल्या पडक्या विहिरीत त्यांनी दोन्ही मुलांसोबत उडी टाकली. आत्महत्येच्या घटनेनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. महिलेच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. महिलेच्या पतीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

नांदेडमध्येही मायलेकाची आत्महत्या

दरम्यान, कोरोनामुळे पतीचं निधन झाल्याचा धक्का बसल्याने पत्नीने मुलासह आत्महत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात घडल्याचे समोर आले आहे. कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान पतीची प्राणज्योत मालवल्याचं समजताच पत्नीने थेट तलाव गाठला. दोन मुलींना घरी ठेवून तिने धाकट्या मुलासह आयुष्य संपवलं.

नेमकं काय घडलं?

तेलंगणातून गंदम कुटुंब नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात मजुरीसाठी आलं होतं. बालाजी मंदिराच्या पाठीमागे राहून मजुरी करत ते उदरनिर्वाह करत होते. दरम्यानच्या काळात 40 वर्षीय पती शंकर गंदम यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांना लोहा येथील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु मंगळवारी उपचारादरम्यान शंकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

पतीच्या निधनाची बातमी समजताच पद्मा गंदम यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पतीच्या पश्चात जगण्याची कल्पना असह्य झाल्याने त्यांनीही आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांचा मुलगा लल्ली याच्यासह पद्मा यांनी सुनेगाव येथील तलाव गाठलं. दोघी मुलींना घरी ठेवून त्यांनी धाकट्या लेकासह तलावात उडी घेतली.

बुलडाण्यातील मायलेकाची अकोल्यात आत्महत्या

दुसरीकडे, अकोला जिल्ह्यातील मन नदीत मायलेकाने आत्महत्या केली होती. आधी 15 वर्षीय तरुणाचा मृतदेह नदीत आढळला. तरुणासोबतच त्याच्या आईनेही नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचं नंतर समोर आलं. मायलेकाच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दोघेही जण बुलडाण्याचे रहिवासी असल्याचं समोर आलं आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनाने पतीचा अखेरचा श्वास, दोन मुलींना घरी ठेवून पत्नीची मुलासह आत्महत्या

बुलडाण्यातील मायलेकाची अकोल्यात आत्महत्या, नदीत उडी घेत आयुष्याची अखेर

(Aurangabad Married Lady commits Suicide with two children)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.