Aurangabad | औरंगाबाद निवडणुकांसाठी आरक्षण लवकरच, उद्या जिल्हा परिषदेची तर 5 ऑगस्ट रोजी महानगरपालिकेची सोडत!

जिल्हा परिषद निवडणुकांसाठीची आरक्षण सोडत 28 जुलै रोजी जाहीर केली जाईल. तर पंचायत ससमिती सोयगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद, गंगापूर, वैजापूर, औरंगाबाद, पैठण या सर्व तालुक्यांच्या ठिकाणी आरक्षणाची सोडत पंचायत समितीच्या सभागृहात काढली जाणार आहे.

Aurangabad | औरंगाबाद निवडणुकांसाठी आरक्षण लवकरच, उद्या जिल्हा परिषदेची तर 5 ऑगस्ट रोजी महानगरपालिकेची सोडत!
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 11:47 AM

औरंगाबादः राज्यातील सत्ताबदल झाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. औरंगाबाद जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह महापालिका निवडणुकांसाठी (Maharashtra Municipal Corporation Elections) इच्छुकांची तयारी सुरु आहे. उद्या म्हणजेच 28 जुलै रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर केली जाणार आहे. जिल्हा परिषदेतील (Aurangabad ZP) गटांच्या आरक्षणासंबंधीची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता नियोजन सभागृहात काढली जाईल. तर महापालिका निवडणुकांसाठीची (Aurangabad Municipal ELection) आरक्षण सोडत देखील लवकरच जाहीर केली जाईल. येत्या 05 ऑगस्ट रोजी ही सोडत काढली जाईल. या सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध केले जाईल. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी आरक्षण कार्यक्रम जाहीर करण्यासंबंधीच्या सूचना सर्व महापालिकांना केल्या.

28 जुलैला जि.प. सहित पंचायत समित्यांचे आरक्षण

जिल्हा परिषद निवडणुकांसाठीची आरक्षण सोडत 28 जुलै रोजी जाहीर केली जाईल. तर पंचायत ससमिती सोयगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद, गंगापूर, वैजापूर, औरंगाबाद, पैठण या सर्व तालुक्यांच्या ठिकाणी आरक्षणाची सोडत पंचायत समितीच्या सभागृहात काढली जाणार आहे. शुक्रवारी 29 जुलै रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांकडे यासंबंधीच्या हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी 29 जुलै ते 2 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नागरिकांनी या सूचना दिलेल्या मुदतीत सादर करण्याचे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

महापालिकेची सोडत 5 ऑगस्ट रोजी

राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी आरक्षण कार्यक्रम जाहीर केला. यानुसार, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, मागासवर्ग प्रवर्ग (महिला) तसेच सर्वसाधारण महिला यासाठी आरक्षित जागांची नोटीस 02 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यास सांगितले आहे. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी वॉर्डांमधील आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात यावी, असे स्पष्ट केले. औरंगाबाद महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर 6 ऑगस्ट रोजी ती प्रसिद्ध करण्यात येईल. स्थानिक वृत्तपत्र, वेबसाइट तसेच शहरातील सूचना फलकावर ते प्रसिद्ध करण्यात यावेत असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानंतर 6 ते 12 ऑगस्टपर्यंत सूचना व हरकती स्वीकारल्या जातील. 20 ऑगस्टला प्रभागनिहाय अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध केले जाईल.

महापालिकेतील आरक्षण कसे?

  •  औरंगाबाद महापालिकेत 126 वॉर्ड आहेत.
  •  हे वॉर्ड 42 प्रभागांत विभागण्यात आले आहेत.
  •  63 जागा महिलांसाठी आरक्षित असतील.
  •  33 जागा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी
  •  34 वॉर्ड ओबीसींसाठी आरक्षित राहतील
  •  24 वॉर्ड अनुसूचित जातींसाठी
  •  02 एसटी प्रवर्गासाठी आरक्षित असतील
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.