Aurangabad | जालन्यानंतर आता औरंगाबादमध्येही रेल्वेची पीटलाइन, रावसाहेब दानवेंच्या घोषणेने पक्षांतर्गत वाद मिटणार का?
औरंगाबादः जालन्यानंतर आता औरंगाबादमध्येही रेल्वेची पीटलाइन (Railway pitline) होणार अशी घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावासाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केली. त्यामुळे आता औरंगाबाद भाजपमधील पक्षांतर्गत वादावर पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रेल्वेची पीटलाइन औरंगाबादेत होणार की जालन्यात यावरून गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरु होता. औरंगादमध्ये (Aurangabad) आधी पीटलाइन होण्याची घोषणा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. […]
औरंगाबादः जालन्यानंतर आता औरंगाबादमध्येही रेल्वेची पीटलाइन (Railway pitline) होणार अशी घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावासाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केली. त्यामुळे आता औरंगाबाद भाजपमधील पक्षांतर्गत वादावर पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रेल्वेची पीटलाइन औरंगाबादेत होणार की जालन्यात यावरून गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरु होता. औरंगादमध्ये (Aurangabad) आधी पीटलाइन होण्याची घोषणा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केली होती. मात्र रावसाहेब दानवे यांनी ही पीटलाइन जालन्यात होण्याची घोषणा करून त्यासाठीची प्रक्रिया सुरु देखील केली. त्यामुळे औरंगाबादमध्ये रेल्वे पीटलाइन होणारच नाही का, असा सवाल सामान्य नागरिक व रेल्वे प्रवासी संघटनांकडून विचारला जात होता. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांपर्यंतही हा वाद गेला होता. मात्र रावसाहेब दानवे यांनी काल औरंगाबादेत केलेल्या घोषणेनंतर या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
100 कोटींतून औरंगाबादमध्ये पीटलाइन
केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादमधील रेल्वे पीटलाइनसंदर्भात घोषणा केली. रेल्वे रुंदीकरण, इलेक्ट्रिफिकेशन, 100 कोटींतून पीटलाइनची सुविधा औरंगाबादमध्ये उपलब्ध करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गडकरी यांच्या प्रयत्नांतून रस्त्यांचं जाळं निर्माण होत आहे. रस्ते सुविधा उपलब्ध झाल्याने डीएमआयसीमध्ये मोठ्या उद्योगांचा समावेश झाला आहे. मनमाडपासून नांदेडपर्यंत 750 कोटी खर्च करून इलेक्ट्रिफिकेशनचे काम झाले असून यामुळे प्रदूषण कमी होईल, असेही दानवे यांनी म्हटले.
राज ठाकरेंच्या सभेबद्दल काय म्हणाले दानवे?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा येत्या 01 मे रोजी औरंगाबादमध्ये होऊ घातली आहे. या सभेला अद्याप पोलिसांनी परवनागी दिलेली नाही. या सभेसाठी आता सात दिवस शिल्लक राहिले असून अद्याप परवानगी मिळाली नसल्यामुळे पुढे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सभेची तारीख आणि सभेचं ठिकाण बदलण्याची विनंती पोलिसांकडून केली जात आहे. मात्र यात काहीही बदल होणार नाही, यावर मनसेही ठाम आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली नाही तरीही ते सभा घेणारच, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी कलं आहे. मनसेच्या आक्रमक भूमिकेला भाजप खतपाणी घालतंय, असा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य महत्त्वपूर्ण मानलं जात आहे.
इतर बातम्या-