धोका जाणवला की सायरन वाजवा, औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा अभिनव उपक्रम, वाचा सविस्तर!

ग्रामीण भागातील वाढत्या चोऱ्या आणि दरोडेखोरांपासून गावकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी कन्नड पोलिसांनी अनोखा उपक्रम राबवला आहे. येथील गावकऱ्यांना त्यांनी अत्याधुनिक सायरन दिला आहे. धोका जाणवल्यास नागरिक या सायरनने पोलीस आणि इतर गावकऱ्यांना जागं करू शकतील.

धोका जाणवला की सायरन वाजवा, औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा अभिनव उपक्रम, वाचा सविस्तर!
देवगाव रंगारी येथील गावकऱ्यांना सायरनचे वाटप
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 7:00 AM

औरंगाबादः जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि दरोड्यांचे सत्र वाढले आहे. त्यामुळे गाव-खेड्यांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, फक्त एक हाक मारा, असा संदेश देत ग्रामीण पोलिसांनी नवी शक्कल लढवली आहे. ग्रामस्थांनी हाक पोलिसांपर्यंत पोहोचण्यासाठी अत्याधुनिक सायरनही दिले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी पोलीस ठाण्यातर्फे हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.

धोका जाणवला की वाजवा सायरन

कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी पोलीस ठाणे परिक्षेत्रात हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. याअंतर्गत ताडपिंपळगाव, देवगाव, जेहूर, औराळा, टाकळी या मोठ्या गावांसह लहान गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर 15 जणांना सायरनचे वितरण करण्यात आले.

पोलीस पाठिशी असल्याची ग्रामस्थांची भावना

आपले घर किंवा वस्तीवर मध्यरात्री कुणी अनोळखी आला, त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यास किंवा परिसरात एखादी गुन्ह्याची घटना घडल्यास घराच्या छतावर लावलेला सायरन वाजवण्याच्या सूचना गावकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमाबद्दल बोलताना जेहूर येथील नागरिक म्हणाले, शेतात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सायरन खूप फायदेशीर आहे. देवगाव रंगारी येथील देविदास जाधव यांच्या घरावर दोन सायरन बसवण्यात आले आहेत. याचा आवाज 1 ते दीड किमीपर्यंत जातो.

‘गुन्ह्यांना आळा बसेल’

देवगाव रंगारी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्यासाहेब भालेराव म्हणाले, पोलीस महानिरीक्षकांची ही मूळ संकल्पना आहे. शेत, वाडी वस्त्यांवर जी एकटी कुटुंबे राहतात, त्यांच्या सुरक्षिततेसाठी याचा फायदा होत आहे. सायरनचे बटण दाबताच परिसरातील लोक, पोलीस मदतीला येऊ शकतात. यामुळे गुन्ह्यांना आळा बसेल.

इतर बातम्या-

आधी नितेश राणेंचं म्याव, म्याव, मग मलिकांचा कॉकटेल ‘कोंबडा’ आणि आता पुन्हा राणेंकडून ‘डुक्कर’, ट्विट, राजकारणाचा स्तर घसरतोय?

Ahmednagar : पेपरफुटीत कोणताही मंत्री अडकणार नाही, आमची यंत्रणा सक्षम, दुसऱ्याला निमंत्रण कशाला?-थोरात

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.