पर्यटकांना सुरक्षित वाटण्यासाठी औरंगाबादेत 100 टक्के लसीकरण आवश्यक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
औरंगाबादः पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या औरंगाबादेत येणाऱ्या पर्यटकांना येथे येताना सुरक्षित वाटावे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात वावरताना विश्वास वाटावा, यासाठी पर्यटनाशी संबंधित सर्व क्षेत्रांतील व्यक्तींचे लसीकरण करावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुचविले आहे. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण (Sunil Chavan) यांनीदेखील औरंगाबाद जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून लवकरच संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण पूर्ण करणार असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
औरंगाबादः पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या औरंगाबादेत येणाऱ्या पर्यटकांना येथे येताना सुरक्षित वाटावे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात वावरताना विश्वास वाटावा, यासाठी पर्यटनाशी संबंधित सर्व क्षेत्रांतील व्यक्तींचे लसीकरण करावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुचविले आहे. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण (Sunil Chavan) यांनीदेखील औरंगाबाद जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून लवकरच संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण पूर्ण करणार असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना दिले.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद
ज्या जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, अशा जिल्ह्यांशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, इतर राज्यातील जिल्ह्यांची जिल्हाधिकारीदेखील उपस्थित होते. या बैठकीला औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय हेदेखील उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत कोणते मुद्दे मांडले?
औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी आजापर्यंत जिल्ह्यात कोरोना विरोधात काय काय उपक्रम राबवले, आणि यापुढे कोणते उपक्रम हाती घेतले आहेत, याची माहिती दिली. ते पुढील प्रमाणे-
- – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन कवच कुंडल अभियान’ राबवून लसीकरण वाढविले आहे.
- ‘मन में है विश्वास’ हा कोरोना विरूध्दच्या लढाईत मनोबल वाढविणारा उपक्रम आम्ही राबविला. या कार्यक्रमात विविध धर्मांचे धर्मगुरू उपस्थित होते तसेच आर्मीचा देखील सहभाग होता. हा कार्यक्रम यापुढेही सुरू राहणार असून त्याची व्याप्ती अधिक वाढविण्यात येईल.
- लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या पहिल्या 25 गावांना विशेष निधी देणार आहोत.
- शहरी तसेच ग्रामीण भागासाठी ‘मेरा वार्ड सौ प्रतिशत टीकाकरण वार्ड’
- ‘संतांची भूमी शंभर टक्के लसीकरण भूमी’ असे वेगवेगळे प्रयोग करून जिल्ह्यात लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचेही जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
इतर बातम्या-