औरंगाबाद : संपात सहभागी झालेल्या 12 जणांवर कारवाई; निलंबित केल्याने एसटी कर्मचारी आक्रमक
आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. दरम्यान संपात सहभागी झालेल्या औरंगाबाद आगारातील 12 कर्मचाऱ्यांवर प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.
औरंगाबाद : आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. दरम्यान संपात सहभागी झालेल्या औरंगाबाद आगारातील 12 कर्मचाऱ्यांवर प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. यातील तीन जणांना बडतर्फ करण्यात आले आहे, तर 9 जणांना निलंबित करण्यात आले. यामध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसह स्थाई कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. दरम्यान निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
आज बैठक
एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज 11 वाजता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे. आजचा दिवस हा एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा असून, या बैठकीमध्ये संपावर तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान त्यापूर्वी मंगळवारी आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटीचे प्रतिनिधी यांच्यामध्ये तब्बल दोन तास बैठक झाली.
काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या
राज्य परिवहन महामंडळाचे सरकारमध्ये विलनिकरण करण्यात यावे. एसटी कर्मचाऱ्यांना क वर्गाचा दर्जा देण्यात यावा. वेतनवाढीसह घरभाडे भत्ता आणि महागाई भत्त्यात वाढ करावी अशा विविध मागण्या एसटी कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. आपल्या मागण्यांसाठी त्यांचे गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलनामुळे बससेवा ठप्प झाली असून, प्रवाशांचे हाल होत आहेत. विशेष: ग्रामीण भागात संपाचा मोठा फटका बसला असून, दळणवळण ठप्प झाले आहे.
संबंधित बातम्या
Aurangabad: जायकवाडीत दुर्मिळ ‘युरेशियन कर्ल्यू’चं आगमन, जगात फक्त 7 हजार पक्षी शिल्लक
तर नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाई करा, सोमय्यांचे थेट ठाकरे सरकारलाच आव्हान