क्रूरतेचा कळस!! हाताला येईल त्या गोष्टीनं मुलाला बेदम मारहाण, अंगावर चटके, कोण आहेत ही जनावरं?

आईचे निधन झाल्यानंतर बापानं दुसऱ्या महिलेशी लग्न केलं. पण लेकरात त्याचं काळीज कधी विरघळलंच नाही. असा क्रूर बाप आणि सावत्र आईनं बारा वर्षाच्या बालकावर अगणित अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये समोर आला.

क्रूरतेचा कळस!! हाताला येईल त्या गोष्टीनं मुलाला बेदम मारहाण, अंगावर चटके, कोण आहेत ही जनावरं?
डॉ. रेखा कदम यांच्या घराची झडती, काळवीटाचे कातडे जप्त
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 11:05 AM

औरंगाबादः आईचे निधन झाल्यानंतर बापानं दुसऱ्या महिलेशी लग्न केलं. पण लेकरात त्याचं काळीज कधी विरघळलंच नाही. असा क्रूर बाप आणि सावत्र आईनं बारा वर्षाच्या बालकावर अगणित अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये समोर आला. या मुलाला घरकाम करायला लावण्यापासून ते लाटणे, कुकरचे झाकण, इतर भांडी अशा हाताला येईल त्या गोष्टींनी बेदम मारहाण केली. काड्याची पेटीची काडी, मेणबत्तीने ठिकठिकाणी चटकेही दिले. मोठ्या भावाच्या सतर्कतेमुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांमध्ये या पती-पत्नीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

काय आहे नेमकं प्रकरण?

या प्रकरणी बारा वर्षीय मुलाच्या 21 वर्षीय मोठ्या भावाने तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, 2015 मध्ये निधन झाले. 2016 मध्ये त्याच्या वडिलांनी नुसरत खान नामक महिलेसोबत दुसरे लग्न केले. दोघेही भाऊ त्यांच्यासोबत राहत होते. मात्र क्षुल्लक कारणामुळे वडील आणि सावत्र आई सतत शिवीगाळ करु लागल्याने या मोठ्या भावाने सहा महिन्यांपूर्वीच घर सोडले. तो आरेफ कॉलनीतील आजोबांकडे राहू लागला.

केवढे हे अत्याचार?

मोठा भाऊ निघून गेल्यानंतर लहान भाऊ वडीलांकडेच रहात होता. मात्र या सावत्र आई आणि वडिलांनी लहान मुलावर अगणित अत्याचार करायला सुरुवात केली. लाटणे, कुकुरचे झाकण, लाकूड हाताला येतील त्या भांड्यांनी त्याला मारहाण झाली. काडेपेटीची काडी, मेणबत्तीचे चटकेही दिले. सगळे घरकाम करायला लावू लागले. 27 डिसेंबर रोजी तर सावत्र आई नुससरतने मुलाच्या तोंडावर बुक्का मारून दात पाडून जखमी केले. त्याचे भिंतीवर डोके आपटले. यामुळे त्याला चक्कर येऊ लागली. 28 डिसेंबर रोजी सकाळी मोठा भाऊ लहान भावाला भेटण्यासाठी गेला तेव्हा तोंडाला मार लागलेला पाहून त्याने चौकशी केली. त्यानंतर लहान भावाने सगळा प्रकार सांगितला. भावाने त्याला तत्काळ आजोबांकडे नेले. वडिलांनी विरोध केला, मात्र मोठ्या भावाने तो जुमानला नाही. या सर्व प्रकाराविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

इतर बातम्या-

Pune Corona alert |पुण्यात कोरोना वेगाने पसरतोय ; आठवड्यात रुग्णसंख्येत तिप्पट वाढ ; जम्बो कोविड सेंटर सज्ज

RRR | रिलीज आधीच वादात अडकला RRR चित्रपट, राजामौली यांच्या चित्रपटाविरोधात तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.