औरंगाबाद-नगर रेल्वे मार्गावर 17 स्थानके निश्चित, सर्वेक्षणासाठी 18 कोटींचा निधी लागणार
औरंगाबाद: प्रस्तावित औरंगाबाद-अहमदनगर (Aurangabad-Ahmadnagar Railway) या 115 किलोमीटरच्या नव्या रेल्वेमार्गाला गती मिळाली असून रेल्वे विभागानेच या मार्गावरील 17 स्टेशनची नावे निश्चित केली आहेत. या मार्गाच्या सर्वेक्षणाला 18 कोटी 75 लाख रुपयांचा निधी लागणार आहे. तर एकूण खर्च 1585 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. डिसेंबर 2021 पर्यंत या मार्गाचा डीपीआर पाठविण्याबाबत रेल्वे विभागाने कळवले आहे. हा […]
औरंगाबाद: प्रस्तावित औरंगाबाद-अहमदनगर (Aurangabad-Ahmadnagar Railway) या 115 किलोमीटरच्या नव्या रेल्वेमार्गाला गती मिळाली असून रेल्वे विभागानेच या मार्गावरील 17 स्टेशनची नावे निश्चित केली आहेत. या मार्गाच्या सर्वेक्षणाला 18 कोटी 75 लाख रुपयांचा निधी लागणार आहे. तर एकूण खर्च 1585 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. डिसेंबर 2021 पर्यंत या मार्गाचा डीपीआर पाठविण्याबाबत रेल्वे विभागाने कळवले आहे. हा रेल्वेमार्ग झाल्यास उद्योगवाढीला मोठी चालना मिळणार आहे.
व्यावसायिक व विद्यार्थ्यांना मोठा फायदा
औरंगाबादहून पुण्याला शिक्षण, नोकरी आणि व्यावसायिक कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. तसेच येथील उद्योजकांची पुण्यातील उद्योगांशी देवाण-घेवाण आहे. त्यामुळेच अनेक वर्षांपासून शहरातील सामान्य जनतेपासून उद्योगपती, व्यावसायिक, पर्यटक हे औरंगाबाद-पुणे रेल्वेमार्गासाठी आग्रही भूमिका मांडत आहेत. या रेल्वे मार्गाचाप्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य व केंद्र सरकारसमोर मांडला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी केवळ औरंगाबाद ते अहमदनगरपर्यंतच्याच रेल्वे मार्गाला परवानगी दिली आहे.
115 किमी मार्गासाठी 138 पूल बांधावे लागणार
115 किलोमीटरच्या औरंगाबाद ते अहमदनगरपर्यंतच्या रेल्वेमार्गासाठी या मार्गावर एकूण 138 पूल बांधावे लागणार असून त्यात 15 मोठे तर 56 छोटे पूल, 17 आरओबीएस आणि 50 आरयूबीएसचा समावेश असणार आहे.
642 हेक्टर जमिनीचे भूसंपादन
औरंगाबाद ते अहमदनगर रेल्वेमार्गासाठी 642.689 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार असून या मार्गासाठी एकूण 1 हजार 585 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
सध्या 265 किलोमीटरचे अंतर
सध्या रेल्वेने औरंगाबाद-मनमाड-नगर-दौंड-पुणे हे अंतर 265 किलोमीटरचे आहे. मात्र यात मनमाड वगळून औरंगाबाद-नगर थेट जोडल्यास हे अंतर अवघ्या 115 किलोमीटरपर्यंत कमी होणार असून यात तब्बल 150 किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. यापुढे नगर-दौंडमार्गे पुण्याला जाण्यास वेळही कमी लागेल. हा रेल्वेमार्ग झाल्यास नागरिकांच्या सोयीसह उद्योगवाढीला चालना मिळणार आहे.
पुणे-औरंगाबाद सहापदरीरस्त्यासाठी भूसंपादन होणार
औरंगाबाद-पुणे रस्ता सहापदरी एक्स्प्रेस हायवे करण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात नुकतीच चर्चा झाली. हा रस्ता करण्यासाठी सध्याच्या मार्गालगत भूसंपादन करावे लागेल. मात्र सध्या तरी औरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडे कुठलीही विचारणा केलेली नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. चव्हाण म्हणाले की ‘गडकरी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत औरंगाबाद-पुणे सहापदरी महामार्गाची चर्चा झाली. या बैठकीत महामार्गाचे संकल्प चित्र दाखवले होते. आम्हीही ऑनलाइन उपस्थित होते. मात्र, या कामाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गेलेला नसल्याने आम्हाला त्याबाबत काहीच विचारणा झालेली नाही.
इतर बातम्या-
पुष्पक एक्सप्रेस दरोडा आणि बलात्कार प्रकरण, आठही आरोपींना बेड्या, पोलिसांनी नराधमांना कसं पकडलं?