औरंगाबादेत भरणार साहित्यिकांचा मेळा, 41 वे मराठवाडा साहित्य संमेलन 25 आणि 26 सप्टेंबर रोजी

औरंगाबाद: गेल्या वर्षी कोरोनाच्या गंभीर प्रसारामुळे रद्द झालेले मराठवाडा साहित्य संमेलन आता या वर्षी औरंगाबादमध्ये होणार आहे. यंदा नियोजित असलेले हे 41 वे मराठवाडा साहित्य संमेलन (Marathwada Sahitya Sammelan) असेल. देगलूर येथील ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार (Babu Biradar) हे संमेलनाचे अध्यक्षपद भूषवतील.  गेल्या वर्षी मार्च महिन्यात हे संमेलन देगलूर येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. […]

औरंगाबादेत भरणार साहित्यिकांचा मेळा, 41 वे मराठवाडा साहित्य संमेलन 25 आणि 26 सप्टेंबर रोजी
औरंगाबाद शहरात होणार 41 वे साहित्य संमेलन
Follow us
| Updated on: Sep 03, 2021 | 6:03 PM

औरंगाबाद: गेल्या वर्षी कोरोनाच्या गंभीर प्रसारामुळे रद्द झालेले मराठवाडा साहित्य संमेलन आता या वर्षी औरंगाबादमध्ये होणार आहे. यंदा नियोजित असलेले हे 41 वे मराठवाडा साहित्य संमेलन (Marathwada Sahitya Sammelan) असेल. देगलूर येथील ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार (Babu Biradar) हे संमेलनाचे अध्यक्षपद भूषवतील.  गेल्या वर्षी मार्च महिन्यात हे संमेलन देगलूर येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ते स्थगित झाले होते. आता कोरोनाची रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाल्याने पुन्हा एकदा साहित्यिकांचा मेळा भरवण्याचा निर्णय साहित्य परिषदेने घेतला आहे.

लोकसंवाद फाऊंडेशनचा पुढाकार

औरंगाबादमध्ये 41 वे साहित्य संमेलन होण्यासाठी लोकसंवाद फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. मराठवाड्यातील साहित्यप्रेमी तरुण प्राध्यापकांनी एकत्र येत लोकसंवाद फाउंडेशन या संस्थेच्या वतीने या संमेलनासाठी निमंत्रण दिले होते. त्यांचे हे निमंत्रण मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत स्वीकारण्यात आले. काल साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांशी ‘लोकसंवाद फाउंडेशन’ चे अध्यक्ष डॉ. राजेश करपे, त्यांचे सहकारी डॉ. राम चव्हाण, डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ. गणेश मोहिते, डॉ. हंसराज जाधव, डॉ. रविकुमार सावंत, प्रा. जिजा शिंदे आणि पत्रकार राम शिनगारे यांनी संमेलनाच्या आयोजनासंबंधी समक्ष चर्चा केली.

अत्यंत साधे, दोन दिवसीय संमेलन

कार्यकारिणीच्या या बैठकीत आयोजकांनी संमेलनाचे स्वरुप अगदी साधे असेल, हे विशेषत्वाने सांगितले. कोणताही भपकेबाजपणा न करता कमीत कमी खर्चात, साधेपणाने संमेलन कसे होईल, यावर चर्चा करून कमी खर्चात संमेलन घेण्याचा निर्धार केला. तसेच संमेलनाचे दिवसही खूप कमी असतील. रविवार दिनांक 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर 2011 या दोन दिवशी हे संमेलन घेण्याचे निश्चित करण्यात आले.

संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार

कोरोनाचा प्रसार आणि महाराष्ट्र शासन तसेच स्थानिक प्रशासनाचे नियम पाळूनच हे संमेलन घेण्यात येईल, अशी ग्वाही लोकसंवाद फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आली. तसेच संमेलनाच्या अध्यक्षस्थानी देगलूरचे ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार हे असतील.  यापूर्वीचे 40 वे मराठवाडा साहित्य संमेलन जालन्यात झाले होते. त्या संमेलनाचे अध्यक्षपद दत्ता भगत यांनी भूषवले होते.

संमेलनासाठी लोकवर्गणीचे आवाहन

लोकसंवाद फाऊंडेशनचे कार्यकर्ते संमेलनाच्या कामाला लागले असून त्यांसाठी बँकेत संमेलनाचे स्वतंत्र खातेही उघडले आहे. उस्मनाबाद येथील संमेलनाप्रमाणेच हे संमेलनदेखील पूर्णपणे लोकवर्गणीतून घ्यावे, असा संकल्प मराठवाडा साहित्य परिषद व लोकसंवाद फाऊंडेशनच्या वतीने सोडण्यात आला आहे. त्यामुळे रसिक वाचकांनी यथाशक्ती आर्थिक मदत करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

इतर बातम्या- 

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब

विद्रोही साहित्य संमेलानाचे ग्रेटा थनबर्ग यांना निमंत्रण, ग्रेटा महाराष्ट्रात येणार का?

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.