Omicron: पालिका अलर्ट! औरंगाबादेत रुग्ण आढळल्यास पदमपुऱ्यात उपचार, 75 बेडचे कोव्हिड सेंटर सुरु होणार!

औरंगाबादमध्ये महापालिकेच्या आयओसी सेंटरमध्ये 75 बेडचे कोव्हिड सेंटर सुरु केले जाणार आहे. त्याची पूर्ण तयारी झालेली असून तेथे ऑक्सिजनची व्यवस्थाही असेल. ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण आढळल्यास त्यांना याच कोव्हिड सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल केले जाणार

Omicron: पालिका अलर्ट! औरंगाबादेत रुग्ण आढळल्यास पदमपुऱ्यात उपचार, 75 बेडचे कोव्हिड सेंटर सुरु होणार!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 10:59 AM

औरंगाबादः भारतासह जगभरात पाय पसरणाऱ्या ओमिक्रॉन (Omicron) विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शहर आणि जिल्ह्यात स्थानिक पातळीवरील यंत्रणाही अलर्ट झाली आहे. औरंगाबादमध्ये महापालिकेच्या (Aurangabad Municipal corporation) आयओसी सेंटरमध्ये 75 बेडचे कोव्हिड सेंटर सुरु केले जाणार आहे. त्याची पूर्ण तयारी झालेली असून तेथे ऑक्सिजनची व्यवस्थाही असेल. ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण आढळल्यास त्यांना याच कोव्हिड सेंटरमध्ये (Covid center ) उपचारांसाठी दाखल केले जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा (Dr. Paras Mandlecha) यांनी दिली.

दक्षिण आफ्रिकेची व्यक्ती पुन्हा निगेटिव्हच!

22 नोव्हेंबरला दक्षिण अफ्रिकेतून एक व्यक्ती कंपनीच्या कामानिमित्त शहरात आला होता. मुंबईत त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात अहवाल निगेटिव्ह आला होता. पुन्हा 23 नोव्हेंबर रोजी त्याची आरटीपीसीआर करण्यात आली. सोमवारीही त्याची चाचणी करण्यात आली. हे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे या व्यक्तीपासून काहीही धोका नाही किंवा ती व्यक्ती देखील सुरक्षित असल्याची माहिती डॉ. मंडलेचा यांनी दिली.

सध्या जीनोम सिक्वेन्सिंगसाठी 72 तास

ओमिक्रॉनचा संसर्ग ओळखण्याची यंत्रणा घाटीच्या प्रयोगशाळेत किंवा औरंगाबाद शहरात नाही. त्यामुळे आता शहरात पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांचे स्वॅब घाटीतून थेट पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहेत. परदेशातून आलेल्या प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी केली जात आहे. अहवाल निगेटिव्ह आला तरी त्यांचा स्वॅब जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्याहून हा अहवाल येण्यासाठी 72 तास लागतात.

इतर बातम्या-

St worker strike : एसटीचा संप मिटता मिटेना, निलंबन आणि दगडफेकीने एसटी कर्मचारी हैराण

New delhi : गाडी थांबवायला सांगितल्यावरही थांबवली नाही, त्यामुळे दुर्घटना, नागालँड गोळीबारावर शहांचं उत्तर

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.