मराठवाड्यात 7,883 किमी रस्ते व 1,114 कोटींची हानी, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांची माहिती

मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शासकीय शाळांचेही मोठे नुकसान झाले आहे. यात 310 शाळांचे नुकसान झाले असून त्यासाठी 8 कोटी 32 लाख रुपये लागतील. तर 156 शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे. त्यासाठी 13 कोटी 25 लाख रुपये लागणार आहेत.

मराठवाड्यात 7,883 किमी रस्ते व 1,114 कोटींची हानी, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांची माहिती
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 11:45 AM

औरंगाबाद: गेल्या दोन महिन्यांतील अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील (damage due to Heavy Rain) अनेक शहरांसह ग्रामीम भागातील रस्त्यांची प्रचंड हानी झाली आहे. तसेच गाव पातळीवरील असंख्य पूलही वाहून गेले आहेत. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील 7,883 किमी रस्त्यांचे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा (Rural Area in Marathwada) उद्ध्वस्त झाली आहे. किमान 1,114 कोटींचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची माहिती आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिली.

1,672 पूल वाहून गेले

अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील नदी व ओढे ओसंडून वाहत होते. मराठवाड्यात ग्रामीण भागात पूल वाहून गेले आहेत. यात ओढ्याला खूप पाणी आल्यामुळे कमी उंचीच्या पुलांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे रस्ता ओलांडता येणे अशक्य बनले आहे. मराठवाड्यात असे 1,672 पूल वाहून गेले असून 341 कोटी 72 लाखांचा निधी त्यासाठी लागणार आहे. शिवाय सातत्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे 754 पाझर तलावांचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी 144 कोटी 84 लाखांचा निधी लागेल.

वीजेच्या खांबांसाठीही 12 कोटी निधी लागणार

अतिवृष्टीमुळे महावितरणचे पोलही पडले आहेत. तसेच रोहित्रांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये 7,922 पोल तर 442 रोहित्र असे 12 कोटी 3 लाखांचा निधी खर्चावा लागणार आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

310 शाळांचे मोठे नुकसान

मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शासकीय शाळांचेही मोठे नुकसान झाले आहे. यात 310 शाळांचे नुकसान झाले असून त्यासाठी 8 कोटी 32 लाख रुपये लागतील. तर 156 शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे. त्यासाठी 13 कोटी 25 लाख रुपये लागणार आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील रस्त्यांचीही हानी

औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या रस्त्याचे 309 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यात ओडीआर रोड, शाळेच्या इमारती, जिल्हा परिषदेच्या पाणी योजना असे 309 कोटींचे नुकसान झाले. 236 कोटींचे नुकसान झाले. सप्टेंबरपर्यंतच्या अतिवृष्टी तर साधारण 64 कोटींचे नुकसान झाल्याची माहिती सीईओ नीलेश गटणे यांनी दिली.

इतर बातम्या- 

जुलैच्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई ऑक्टोबरमध्ये जाहीर, पुणे विभागाला सर्वाधिक मदत

अतिवृष्टी बाधित क्षेत्राचे ड्रोनद्वारे पंचनामे करावेत; भुजबळांचे अधिकाऱ्यांना आदेश

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.