जालन्यात 9 टन लिंबाची लाकडे, 3 लाखांचा मुद्देमाल ताब्यात, वनविभागाची कारवाई

जालनाः जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील (Jalna Ambad) धाकलगाव शिवारात रात्रीच्या वेळी लिंबाच्या झाडाची अवैध वृक्षतोड सुरू असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. बुधवारी मध्यरात्री वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वृक्षतोडीवर कारवाई करयात साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अंदाजे पन्नास हजार रुपये किंमतीची 9 टन लिंबाची लाकडे व तीन लाख रुपये किंमतीचे आयशर वाहन असा साडेतीन लाखांचा मुद्देमाल […]

जालन्यात 9 टन लिंबाची लाकडे, 3 लाखांचा मुद्देमाल ताब्यात, वनविभागाची कारवाई
जालन्यात 9 टन लिंबाचे लाकूड जप्त
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 3:39 PM

जालनाः जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील (Jalna Ambad) धाकलगाव शिवारात रात्रीच्या वेळी लिंबाच्या झाडाची अवैध वृक्षतोड सुरू असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. बुधवारी मध्यरात्री वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वृक्षतोडीवर कारवाई करयात साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अंदाजे पन्नास हजार रुपये किंमतीची 9 टन लिंबाची लाकडे व तीन लाख रुपये किंमतीचे आयशर वाहन असा साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन व्यापारी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.

अंबडमध्ये सर्रास सुरु होती वृक्षतोड

जालना जिल्ह्यातील अंबड परिसरात गेल्या काही दिवसांपासून खुलेआम वनसंपदा नष्ट होत आहे. लिंबाचे झाड तोडण्यास कायद्याने बंदी असतानान इतर जिल्ह्यांतून येऊन अंबड तालुक्यात बस्तान मांडून काही व्यापाऱ्यांनी सर्रास वृक्षतोड सुरु ठेवली होती. विशेष करून रात्रीच्या वेळी जास्त वृक्षतोडीची वाहतूक असते. या व्यापाऱ्यांना कोणाचा वरदहस्त लाभलेला आहे, या प्रश्नच आहे. पोलिसांनी अनेक वेळा अवैध वाहतूक करणारी वाहने पकडली आणि जप्त केली. परंतु कुठेही वृक्षतोड थांबण्याचे नाव घेत नाही. वन विभाग याकडे सर्रास डोळेझाक करत असल्यानेच व्यापाऱ्यांचे अधिक मनोबल वाढत आहे, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

धाकलगाव शिवारात डाव्या कालव्याजवळ कारवाई

अंबडमधील धाकलगाव शिवारात डाव्या कालव्याजवळ लिंबाचे लाकूड तोडून एक आयशर ट्रक भरून जात होता. रात्रीच्या वेळी वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी मनकवार, वनपरिक्षेत्र अधिकारी अभय अटकळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत लाकूड आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला असून औरंगाबादचे लाकूड व्यापारी मन्सूर व अल्ताफ हे अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.

इतर बातम्या-

राज्यात 7 महिन्यात 8 हजार प्राध्यापकांची भरती पूर्ण करणार, तर 5 हजार प्राध्यापकांना जुनी पेन्शन, उदय सामंतांची घोषणा

ED च्या कारवाईने औरंगाबादेत खळबळ, उद्योजक-राजकारण्यांचे धाबे दणाणले, जालना-लातुरातही धाडसत्र

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.