नोकरीवर घ्या नाही तर आत्महत्या करतो, औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांना धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल!
प्रशांत साबळे यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना समक्ष भेटून तसेच मोबाइल वर संदेश पाठवून आपण विष प्राशन करून किंवा आत्मदहन करून आत्महत्या करीत असल्याची धमकी दिली होती.
औरंगाबादः अंशकालीन कर्मचारी असल्याचे बनावट कागदपत्रे तयार करून कोतवाल म्हणून कामावर घ्या, अन्यथा आत्महत्याच करतो, अशी धमकी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना (Collector Sunil Chavan) देणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हॉट्सअपद्वारे त्याने ही धमकी दिली होती. याविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत रामभाऊ साबळे (Prashant Sable) असे या संशयिताचे नाव आहे. 2013 पासून आजपर्यंत सेवेत येणाऱ्या सर्वच जिल्हाधिकाऱ्यांसमोर त्याने असे प्रकार केल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून तहसीलदार ज्योती पवार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून तहसीलदार ज्योती पवार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रशांत याने जिल्हाधिकाऱ्यांना ‘मी पदवीधर अंशकालीन कर्मचारी असून 1999 सालापासून काम करत असल्याने शासकीय सेवेत सामावून घेऊन कोतवाल पदावर नियुक्ती द्यावी, असे निवदेन दिले होते. त्यावर आजवरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच विद्यमान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सुनावणी घेऊनही शासकीय सेवेत थेट पद्धतीने नियुक्ती मिळण्यास पात्र ठरत नसल्यासंदर्भात त्याचे सर्वच अर्ज निकाली काढले होते. त्यानंतरही प्रशांत साबळे यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना समक्ष भेटून तसेच मोबाइल वर संदेश पाठवून आपण विष प्राशन करून किंवा आत्मदहन करून आत्महत्या करीत असल्याची धमकी दिली होती.
संशयिताविरोधात माहिती काढली
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संशयिताविरोधात जुनी माहिती मागवली. तेव्हा साबळेने तत्कालीन नायब तहसीलदार मीना यांची बनावट सही करून 29 ऑगस्ट 2017 रोजी औरंगाबाद तहसीलदार यांचा बनावट व खोटा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला. तसेच तो तहसीलदार मीना वराडे कार्यालयाच्या आवक जावक विभागात खतविल्याचे समोर आलसे. तसेच रामभाऊ साबळे याने तहसील कार्यालयात अंशकालीन कर्मचारी म्हणून कामकाज केले असल्याचेही उघड झाले. मला दोन दिवसात काही झाले तर आपण जबाबदार असाल, असास संदेश पाठवून त्याने आत्महत्येची धमकी दिली होती.
इतर बातम्या-