औरंगाबादच्या व्हॅल्यू डी इमारतीला भीषण आग, अगीत अडकलेल्या दोघांची सुखरूप सुटका
औरंगाबाद शहरातील एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबाद शहरातील व्हॅल्यू डी या इमारतीला भीषण आग लागली होती. या आगीमध्ये दोन व्यक्ती अडकल्या होत्या. स्थानिकांनी आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.
औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) शहरातील एका इमारतीला भीषण आग (Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबाद शहरातील व्हॅल्यू डी या इमारतीला (Value D building) भीषण आग लागली होती. या आगीमध्ये दोन व्यक्ती अडकल्या होत्या. स्थानिकांनी आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. तसेच या इमारतीमध्ये अडकलेल्या दोन जणांची सुखरूप सुटका देखील करण्यात आली आहे. दुपारी दोनच्या सुमारास अचानक या इमारतीला आग लागली होती. ही आग नेमकी काशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे, मात्र शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग भडकल्याने काही काळ या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
शॉट सर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद शहरातील व्हॅल्यू डी या इमारतीला भीषण आग लागली. दुपारी दोनच्या सुमारास इमारतीला आग लागली. इमरतीला जेव्हा आग लागली तेव्हा इमारतीमध्ये दोन व्यक्ती अडकले होते. घटनेची माहिती मिळताच अग्नशमन दलाले घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र आग शॉट सर्कीटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मोठी दुर्घटना टळली
या आगीमध्ये दोन व्यक्ती अडकले होते. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान दाखवत या दोघांची सुटका केली. जवानांनी त्यांना सुखरूपणे इमरतीच्या बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र या आगीत इमरातीचे मोठे नुकसान झाले आहे. इमरातीचा मोठा भाग जळून खाक झाला आहे. इमारतीला अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते. तसेच बघ्यांनी गर्दी केली होती.
संबंधित बातम्या
वाहने भाड्याने चालवायला घ्यायचे, नंतर परस्पर विकायचे; सातारा पोलिसांनी ‘असा’ केला आरोपींचा पर्दाफाश