Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत दिलजमाई, गल्लीत गोंधळ, सत्तार-दानवेंच्या भेटीने सोयगाव नगरपंचायतीत कार्यकर्ते का संभ्रमात?

औरंगाबादचे शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपचे नितीन गडकरी आणि रावसाहेब दानवे या दोन्ही नेत्यांची भेट घेतली. एवढंच नाही तर शिवसेना-भाजप युतीविषयी वक्तव्यही केलं. दिल्लीतल्या या घटनांमुळे गल्लीत मात्र पार गोंधळ उडाला.

दिल्लीत दिलजमाई, गल्लीत गोंधळ, सत्तार-दानवेंच्या भेटीने सोयगाव नगरपंचायतीत कार्यकर्ते का संभ्रमात?
रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांची नवी दिल्ली येथील भेट
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 7:10 AM

औरंगाबादचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यांनी दिल्लीत भाजपचे मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेतली. त्यानंतर गडकरींनी युतीचा पूल बांधला तर भाजप शिवसेना एकत्र येऊ शकतात, असं वक्तव्यही अब्दुल सत्तार (Abdul Sarrar) यांनी केलं. सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी अब्दुल सत्तार यांचीही गळाभेट घेतली. आधीच महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या चर्चा सुरु असताना या दोन मंत्र्यांच्या भेटीमुळे आणि सत्तार यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना आणखीच पेव फुटले. सत्तार दिल्लीत वक्तव्य करून मोकळे झाले, मात्र इकडे औरंगाबाद जिल्ह्यातील कार्यकर्ते मात्र संभ्रमात पडले. नगरपंचायत निवडणुकीत आता भाजपसमोर कोणती भूमिका घ्यायची, यावरूनच कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला.

इकडे सोयगावात काय घडलं?

सोयगाव नगरपंचायतीसाठी पहिल्या टप्प्यात 13 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजप-शिवसेना यांनी प्रचारादरम्यान चिखलफेक केल्याने दोन्ही पक्षात दरी निर्माण झाली आहे. आता पुन्हा चार जागांसाठी निवडणुका लागू होत असताना राज्यमंत्री सत्तार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेऊन भाजप-शिवसेनेच्या युतीचे संबंध पुन्हा सुधारू शकतात, असे उद्गार काढले. तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचीही भेट घेतल्याचा फोटो व्हायरल झाला. या दोन्ही घटनांमुळे स्थानिक कार्यकर्ते मात्र चक्रावले आहेत. आता उरलेल्या चार जागांसाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर विरोध घ्याला लागणार असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

स्थानिक राजकारणावर काय परिणाम?

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे नगरपंचायत निवडणुकीच भाजप-शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी कमी होती, अशी शक्यता आहे. याआधीच्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचारादरम्यान, सोयगावमधील जमिनी बळकावण्यापासून ते सोलापूर-जळगाव रेल्वे सुरु करण्यापर्यंत विकासाचे वाभाडे दोन्ही पक्षांच्या प्रचार प्रमुखांनी काढले होते. त्यामुळे आता उर्वरीत चार जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना कुठे प्रचारसभा घेतील आणि एकमेकांवर आरोप करताना सावध पवित्रा घेतील का, हे उत्सुकतेने पाहिले जाईल.

इतर बातम्या-

PM Security Breach: एवढ्याशा घटनेचा राईचा पर्वत केला जातोय; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं विधान

केळ्यासारखा दिसणारा साप, नाव बनाना बॉल पायथन! विषासाठी नाही तर मग कशासाठी ओळखला जातो?

सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप.
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड.
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश.
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू.
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.