Aditya Thackeray : उद्या रस्त्यावर दिसले तर बंडखोरांना विचारा गद्दार का झालात?; आदित्य ठाकरेंच्या आवाहनाला शिवसैनिक प्रतिसाद देणार?

उद्या रस्त्यावर दिसले तर त्यांना हात जोडून विचार गद्दार का झालात? असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं. यावेळी शिवसैनिकांकडून देखील जोरदार प्रतिसाद मिळाला.

Aditya Thackeray : उद्या रस्त्यावर दिसले तर बंडखोरांना विचारा गद्दार का झालात?; आदित्य ठाकरेंच्या आवाहनाला शिवसैनिक प्रतिसाद देणार?
उद्या रस्त्यावर दिसले तर बंडखोरांना विचार गद्दार का झालात?; आदित्य ठाकरेंची शिवसैनिकांना साद
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 10:18 PM

नाशिक : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाने शिवसेना हादरवून सोडली आहे. त्यामुळे उरलेल्या शिवसैनिकांना आपल्यासोबत ठेवण्याचा प्रयत्न सध्या आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून सुरू आहेत. आमदार आदित्य ठाकरे शिव संवाद यात्रेच्या निमित्ताने निमित्ताने महाराष्ट्रात शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. आज आदित्य ठाकरे यांनी औरंगाबद येथे शिवसैनिकांशी संवाद साधला. अनेक वर्षांचं ‘स्वप्न’ “संभाजी नगर” करता आल्यानं पूर्ण झालं याचा अभिमान आहे, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं. उद्या रस्त्यावर दिसले तर त्यांना हात जोडून विचार गद्दार का झालात? असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं. यावेळी शिवसैनिकांकडून देखील जोरदार प्रतिसाद मिळाला.

लोकांच्या मनात काय ते बघा

आदित्य ठाकरे म्हणाले, इथलं वातावरण, हे चित्र पाहिल्यावर माझी एवढीच इच्छा आहे, जे गद्दार आहेत त्यांनी येऊन बघावं आणि जाणून घ्याव्यात लोकांच्या मनात काय आहे. उद्धव आहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिला निर्णय रायगड किल्ल्याच्या संवर्धनसाठी 600 कोटी देण्याचा निर्णय घेतला , आणि शेवटचा निर्णय संभाजी नगर करण्याचा. जिथे जातोय तिथे उद्धव साहेबांबद्दल प्रेम आणि तुमचे आशीर्वाद मला मिळताहेत. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, सगळं ओळखून आहे, सगळं बघत आहे. जिथे जातोय तिथे लोक शिवसैनिक भेटून सांगतायत आम्ही तुमच्या सोबत आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

कामांना स्थगिती देण्याचं काम सुरू

आज सकाळी हनुमान आणि रामाच दर्शन झालं, पवित्र नातं; पण चांगलं दर्शन झालं नंतर बोलावं कोणावर लागतंय, तर ते गद्दारांवर…! कलयुगातील आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला निघालोय. नव्या सरकारचा पोरकटपणा होता, हे आपण निर्णय घेतले होते त्याला स्थगिती दिली. संभाजी नगर नावाला स्थगिती, नवी मुंबई एअरपोर्ट, धाराशिव नावाला स्थगिती दिली, पण लोकांनी विरोध केल्यावर स्थगिती हटवली. आपण नाव बदलताना कोणत्याही जाती धर्मात दंगली झाल्या नाहीत म्हणून त्यांच्या पोटात दुखलं असेल. स्थगिती देऊन मग दंगल होईल, वाद वाढतील मग नाव परत देऊ असं त्यांना वाटलं असेल. गेली अडीच वर्षे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत काम करत असताना महाराष्ट्र शांत, प्रगतिशील राहिला. आपण आयोद्धेला गेलो, तिरुपती नवी मुंबईत बनवतोय, अयोद्धेत महाराष्ट्र सदन बनवण्याचा निर्णय घेतला होता, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

सुभाष देसाई यांचं कौतुक

आदित्य ठाकरे पूढे म्हणाले, देसाई साहेबांसारखा एकनिष्ठ शिवसैनिक, अगदी 50 असल्यासारखे काम करतात. डाओसमध्ये त्यांनी काम करून दाखवलं, इथले पालकमंत्री म्हणून काम करत होते, साडे सहा लाख कोटींची गुंतवणूक आणली, आणि पक्ष वाढवण्याच कामही केलं, असं कौतुक आदित्य ठाकरे यांनी सुभाष देसाई यांचं केलं.

तीन टर्म मिळाले नाही तेवढे पैसे दिले

गेल्या अडीच वर्षात कधीही राजकीय मेळाव्यासाठी इथे आलो नाही, विकास कामाच्या कार्यक्रमासाठी येत राहिलो. अडीच वर्षात केवळ विकास कामासाठी आलो. मी रात्री 2 वाजता फिरून रस्त्यांची पाहणी केली आणि रस्ते कसे होत आहेत हे पाहिलं. माझं या आमदारांना चॅलेंज आहे जे पैसे तीन टर्म नाही मिळाले तेवढे दिले. सगळं नीट चाललं होत तर मग गद्दारी का? त्यांच्या पत्रकार परिषदा पहा चेहरे कसे पडले आहेत. मला तुम्ही आसूड दिला त्याचा वापर मी करणार नाही तुम्ही मतदानाच्या पेटीतून उत्तर द्या. आपण मिठी मारली पण त्यांच्या हातात सुरा होता, हे कळलं नाही, अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.