AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abdul Sattar : अर्जुन खोतकरांपाठोपाठ आणखी 4 खासदार, 8 आमदार आमच्यासोबत येणार, अब्दुल सत्तार यांचं मोठं विधान

इम्तियाज जलील यांना राजकारणाचे दुकान चालवण्यासाठी हे करावं लागतं. पण जलील यांनी काळे झेंडे दाखवण्याऐवजी विकासाचे काम करून घ्या, असा सल्ला अब्दुल सत्तार यांनी दिला.

Abdul Sattar : अर्जुन खोतकरांपाठोपाठ आणखी 4 खासदार, 8 आमदार आमच्यासोबत येणार, अब्दुल सत्तार यांचं मोठं विधान
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 5:05 PM

औरंगाबाद : अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी एकनाथ शिंदे गटात सामील व्हावेत, यासाठी अब्दुल सत्तार यांनी प्रयत्न केले. अर्जुन खोतकर यांनी आज शिंदे गटात सहभागी होण्याची घोषणा केली. आता आणखी 2 ते 4 खासदार आणि 7 ते 8 आमदार आमच्यासोबत येणार आहेत, असा गौप्यस्फोट अब्दुल सत्तार यांनी केला. त्यामुळं राजकीय विश्लेषकांच्या (Political Analyst) भुवया उंचावल्या आहेत. आता कोणते खासदार आणि कोणते आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होतील, याची चर्चा सुरू झाली आहे. अब्दुल सत्तार म्हणाले, ईडीचा (ED) विषय मोठा नाही. अर्जुन खोतकर यांनी घोटाळा केलेला नाही. फक्त कागदांची अनियमितता आहे. त्यामुळे ईडीचे काम ईडी करेल. त्यात काही मोठा विषय नाही.

टोपीचा मुक्काम पोस्ट वाढलाय

रामनगर कारखाना सुरू होईल, अशी अपेक्षा अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कारखान्याला मदत करतील. अर्जुन खोतकर यांना खारीचा वाटा आम्ही नक्कीच देऊ, असंही अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं. जालना लोकसभा ही भाजपची आहे. त्यामुळे अर्जुन खोतकर यांना विधानसभा की, विधानपरिषद काय द्यायचं हे ठरवू. माझ्या टोपीचा मुक्काम पोस्ट आता वाढला आहे, अशी मिश्किल्लीही त्यांनी केली.

शिवसेना कुणाची 8 तारखेला कळेल

अब्दुल सत्तार यांनी सांगितलं की, आम्हाला खुश करण्यासाठी हा दौरा नाही. एकनाथ शिंदे अनेक ठिकाणी जात आहेत. त्यामुळे या टीकेला महत्व नाही. लोक चर्चा करतात. चर्चेला खर्च येत नाही. त्यामुळे लोक बोलत असतात. शिवसेना कुणाची असली कुणाची नकली हे 8 तारखेला ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवाय आणखी 2 ते 4 खासदार आणि 7 ते 8 आमदार आमच्यासोबत येणार आहेत, असं म्हटलं. यामुळं राजकीय विश्लेषकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

इम्तियाज जलील यांनी विकासकामं करून दाखवावं

इम्तियाज जलील यांना राजकारणाचे दुकान चालवण्यासाठी हे करावं लागतं. पण जलील यांनी काळे झेंडे दाखवण्याऐवजी विकासाचे काम करून घ्या, असा सल्ला अब्दुल सत्तार यांनी दिला. अब्दुल सत्तार यांनी अर्जुन खोतकर हे शिंदे गटात प्रवेश करतील, असं सांगितलं. त्यानंतर अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटात जात असल्याची घोषणा केली. आता आणखी काही खासदार आणि आमदार शिंदे गटात येणार असल्याचं सांगितलं. त्यामुळं मूळ शिवसेनेत किती खासदार आणि आमदार राहतात, हे पाहावं लागेल.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.