Dr. BAMU विद्यापीठात विद्यार्थी, आंबेडकरी संघटना आक्रमक, भ्रष्टाचार, कर्मचाऱ्यांवरील अन्यायाविरोधात आंदोलन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भ्रष्टाचार तसेच कर्मचाऱ्यांवरील अन्यायाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. आंबेडकरी संघटना तसेच विद्यार्थ्यांनी हे आंदोलन छेडले असून आज येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Dr. BAMU विद्यापीठात विद्यार्थी, आंबेडकरी संघटना आक्रमक, भ्रष्टाचार, कर्मचाऱ्यांवरील अन्यायाविरोधात आंदोलन
BAMU
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 6:00 PM

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भ्रष्टाचार तसेच कर्मचाऱ्यांवरील अन्यायाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. आंबेडकरी संघटना तसेच विद्यार्थ्यांनी हे आंदोलन छेडले असून आज येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आंदोलकांनी आक्रमक पवित्रा धारण केला होता. विद्यापीठाचा गेट खोलण्यासाठी आंदोलकांनी राडा घातल्याचेही पाहायाला मिळाले.

विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलकांचा राडा 

औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आले आहे. विद्यापीठात वेगवेगळ्या विभागात मोठ्या प्रमाणत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात येतोय. तसेच काही कर्मचाऱ्यांवर अन्यायदेखील सुरु असल्याचा आरोप आंबेडकरी संघटनांनी घेतला आहे. याच कारणामुळे आंबेडकरी संघटनांनी भ्रष्टाचार तसेच कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाविरोधात आक्रमक पवित्रा धारण करत आंदोलन छेडले आहे. आज विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलकांनी राडा घातला. या आंदोलनात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे येथे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा

तर दुसरीकडे मागील महिन्यात विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले होते. विद्यापीठातील जनसंपर्क अधिकाऱ्यावर एका विद्यार्थिनीने विनयभंगाचा आरोप केला होता. त्यानंतर विद्यार्थिनीच्या तक्रारीवरुन जनसंपर्क अधिकाऱ्याविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विद्यार्थिनीशी अश्लील चॅटिंग 

विद्यार्थिनीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी पीडितेशी अश्लिल चॅटिंग केली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर विद्यार्थिनीने थेट बेगमपुरा पोलीस ठाणे गाठले होते. तसेच येथे विद्यार्थिनीने तक्रार दाखल केली होती. विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांच्यावर कलम 354 ड आणि 509 प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या शिंदे यांना निलंबित करण्यात आलं आहे.

इतर बातम्या :

जयंत पाटलांकडून फडणवीसांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची पाठराखण! तज्ज्ञांच्या मतावर बोलणं टाळलं

VIDEO : प्रेयसीचं ऐकलं आणि काय झालं… आधी मारहाण, नंतर चपलेचा हार घालत गावात धींड, मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसातही नेलं

नागपूरच्या निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोलन, शैक्षणिक शुल्कमाफीसह केल्या महत्त्वाच्या मागण्या

(ambedkarite organization and students protest in aurangabad bamu university against corruption and Injustice on employees)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.