औरंगाबादेत बांधकाम करायचंय? 8 दिवसात परवानगी मिळवा, महापालिका प्रशासनाची काय ऑफर?
महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी या बैठकीत व्यावसायिकांची भेट घेतली. तसेच यापुढे व्यावसायिकांना बांधकाम परवाने फक्त ऑनलाइन पद्धतीने मिळतील.
औरंगाबादः बांधकाम परवाना मिळवण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना महानगरपालिकेत (Aurangabad municipal corporation) फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी मनपाने नवीन योजना सुरु केली आहे. यासाठी व्यावसायिकांना ऑनलाइन पद्धतीने बांधकाम परवानगी (Construction permission) मिळण्यासाठी अर्ज करावा लागेल. तसेच ज्यांनी अर्ज केले आहेत, त्यांनी शुल्क भरणा केल्यास त्यांना काही दिवसातच बांधकामाला परवानगी मिळू शकते. अशा पद्धतीने प्रक्रिया केल्यास आठ दिवसात बांधकाम परवानगी मिळून कामाला प्रत्यक्षपणे सुरुवात करता येऊ शकेल, असे महापालिकेच्या नव्या योजनेत म्हटले आहे. मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar Pandey) यांनी शुक्रवारी ही योजना जाहीर केली.
बांधकाम व्यावसायिकांची बैठक
मनपा अधिकारी व बांधकाम व्यावसायिकांची शुक्रवारी क्रेडाईच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष नितीन बगडिया, उपाध्यक्ष विकास चौधरी, भास्कर चौधरी, सचिव अखिल खन्ना आदी व्यावसायिक तसेच महापालिकेच्या नगर रचना विभागाचे उपसंचालक ए.बी. देशमुख, उप अभियंता संजय कोंबडे, संजय चामले यांची उपस्थिती होती. महापालिकेला कर्जमुक्त करण्याचा संकल्प प्रशासकांनी केला आहे. यात नगर रचना विभागाकडून मिळणारे उत्पन्न मोठे आहे. त्यात आणखी भर पडावी, असा मनपाचा या योजनेमागील हेतू आहे.
व्यावसायिकांना फक्त ऑनलाइन पद्धतीनेच परवाने
महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी या बैठकीत व्यावसायिकांची भेट घेतली. तसेच यापुढे व्यावसायिकांना बांधकाम परवाने फक्त ऑनलाइन पद्धतीने मिळतील. नियमानुसार, भोगवटा प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन प्रशासकांनी केले आहे. नगर रचना विभागाने यंदा तब्बल 100 कोटी रुपयांचा महसूलाचा आकडा पार केला आहे. त्यात आणखी भर पडावी, यासाठी पांडेय यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कामाला लावले आहे.
इतर बातम्या-