गड्या आपला गाव बरा… विद्यापीठातील प्रवेशाकडे विद्यार्थ्यांची पाठ, 62 टक्के जागा रिक्त, स्थानिक कॉलेजला पसंती
औरंगाबादः कोरोना महामारीमुळे शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम झाला असून दूरवरील शिक्षण किंवा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी सध्या तरी फार कुणी धाडस करत नाहीये, असेच चित्र आहे. यावरून कोरोनाची दहशत अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात (BAMU, Aurangabad) प्रवेश घेण्याऐवजी अनेकांनी स्थानिक महाविद्यालयांनाच (Collage Admission) प्राधान्य दिले आहे. यामुळे विद्यापीठातील सुमारे 62 […]
औरंगाबादः कोरोना महामारीमुळे शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम झाला असून दूरवरील शिक्षण किंवा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी सध्या तरी फार कुणी धाडस करत नाहीये, असेच चित्र आहे. यावरून कोरोनाची दहशत अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात (BAMU, Aurangabad) प्रवेश घेण्याऐवजी अनेकांनी स्थानिक महाविद्यालयांनाच (Collage Admission) प्राधान्य दिले आहे. यामुळे विद्यापीठातील सुमारे 62 टक्के जागा अद्यापही रिक्त असल्याचे समोर आले आहे.
तिसऱ्या लाटेची धास्ती
औरंगाबाद शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी मराठवाड्याच्या ग्रामीण भागांतून असंख्य विद्यार्थी दरवर्षी येत असतात. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट संपली तरीही तिसऱ्या लाटेच्या भीतीने पालक आपल्या पाल्यांना विद्यापीठात शिक्षणासाठी पाठवण्यास तयार नाहीत. त्यामुळे या वर्षी पदवी आणि पदव्युत्तरचे केवळ 5 हजार 500 विद्यार्थ्यांनीच नोंदणी केली आहे. मागील वर्षी सुमारे 17 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. मागील वर्षीच्या तुलनेत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या अडीच पट कमी झाल्याने विद्यापीठातील केवळ 38 टक्के जागांवरच प्रवेश निश्चित झाले असून अद्याप 62 टक्के जागा रिक्त आहेत.
जवळच्या महाविद्यालयांना प्राधान्य
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांच्या ग्रामीण भागांतून दरवर्षी औरंगाबादच्या विद्यापीठात प्रवेश होत असतात. मात्र कोरोनाच्या धसक्यामुळे ग्रामीम भागातील विद्यार्थी विद्यापीठाऐवजी स्थानिक महाविद्यालयात प्रवेश घेण्याला पसंती देत असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांनी दिली.
स्पॉट फेरीचे आयोजन
विद्यापीठातील 62 टक्के जागा रिक्त असल्याने प्रवेशाकरिता विविध विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. तसेच 29 ऑक्टोबर रोजी विद्यापीठाने स्पॉट प्रवेश फेरीचे आयोजनही केले आहे. या फेरीत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रवेश घेतील, असा दावा कॅप्टन सुरेश गायकवाड यांनी केला आहे.
इतर बातम्या-