एमआयएमच्या ऑडिओ क्लिपने औरंगाबादेत खळबळ, पक्षात फूट पडल्याचे संभाषण
औरंगाबादः एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी (Asduddin Owaisi) शनिवारी खुलताबादेत (Khultabad, Aurangabad) पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या बैठकीत असताना इकडे औरंगाबादेत वेगळीच खळबळ माजली होती. शहरातील काही मंडळींनी एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली. शहरातील एमआयएम (MIM) पक्षात फूट पडणार असल्याचे संभाषण या क्लिपमध्ये असून त्यात काही नगरसेवकांची नावेही घेण्यात आली. त्यामुळे एका नगरसेवकाने थेट पोलीस स्टेशनही गाठले. […]
औरंगाबादः एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी (Asduddin Owaisi) शनिवारी खुलताबादेत (Khultabad, Aurangabad) पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या बैठकीत असताना इकडे औरंगाबादेत वेगळीच खळबळ माजली होती. शहरातील काही मंडळींनी एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली. शहरातील एमआयएम (MIM) पक्षात फूट पडणार असल्याचे संभाषण या क्लिपमध्ये असून त्यात काही नगरसेवकांची नावेही घेण्यात आली. त्यामुळे एका नगरसेवकाने थेट पोलीस स्टेशनही गाठले.
10 नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला?
एमआयएम पक्षांतर्गत गटबाजी वाढल्याने त्याची दखल घेण्याकरिता पक्षाध्यक्षांना स्वतः हस्तक्षेप करावा लागत असल्याचे वृत्त असतानाच नगरसेवकांबाबतच्या नव्या ऑडिओ क्लिपने चर्चांना आणखीच उधाण आले. शहरात सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेल्या या क्लिपमधील संभाषण अत्यंत खळबळजनक आहे. एमआयएम पक्षातील तब्बल 10 नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार असल्याचे यात सांगण्यात आले आहे. तसेच माजी नगरसेवक अज्जू नाईकवाडी यांचे नाव ऑडिओ क्लिपमध्ये उघडपणे घेण्यात आले. एम.पी. या व्हॉट्सअप ग्रुवर याची जोरदार चर्चा झाली. या सर्व प्रकाराला कंटाळून अज्जू नाईकवाडी यांनी सिडको ठाण्यात तक्रार दाखल केली.
अज्जू नाईकवाडींची पोलिसांत धाव
या ऑडिओ क्लिपमध्ये माजी नगरसेवक अज्जू नाईकवाडींचे उघडपणे नाव घेण्यात आल्यानंतर शहरात अनेक चर्चांना उधाण आले. या त्रासाला कंटाळून नाईकवाडी यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या क्लिपमध्ये माझ्यासोबत जेवण झाले, त्यांनी होकार दिल्याचे बोलले गेले आहे. पण मुळात मला राष्ट्रवादीचे कुणी भेटलेच नाही. त्यामुळे माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे नाईकवाडी यांनी जाहीर केले.
इतर बातम्या-