गोण्यात भरून आणायचा नोटा, आता खात्यात शून्य!! औरंगाबादच्या 30-30 घोटाळ्याचा सूत्रधार संतोषचे नाशिक कनेक्शन काय?

पोलीस कोठडीतील आरोपी संतोष राठोडने दिलेल्या माहितीवरून त्याचा नातेवाईक राजेंद्र देविदास पवार (सातारा परिसर) याच्याकडून पैशांचा हिशेब असलेल्या तीन डायऱ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यात मूळ गुंतवणूकदार कोण आहेत, तसेच मध्यस्थ एजंट कोण आहेत, याचा तपास सुरु आहे.

गोण्यात भरून आणायचा नोटा, आता खात्यात शून्य!! औरंगाबादच्या 30-30 घोटाळ्याचा सूत्रधार संतोषचे नाशिक कनेक्शन काय?
औरंगाबादमधील 30-30 घोटाळ्याचा सूत्रधार संतोष राठोड
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 9:45 AM

औरंगाबादः जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना 30 टक्के व्याजाने परतावा देण्याचे अमिष दाखवून कोट्यवधी रुपये हडपणारा 30-30 योजनेचा (30-30 Scam) मुख्य सूत्रधार सध्या औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात आहे. भोळ्या-भाबड्या शेतकऱ्यांना या योजनेत अडकवून सुमारे 500 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप संतोषवर आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी आरोपी संतोष राठोड (Santosh Rathod) याला कन्नड येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली होती. ग्रामीण भागातील लोकांचे कोट्यवधी रुपये लुबाडल्याचा आरोप असलेल्या संतोषच्या खात्यात मात्र सध्या दमडीही नसल्याचे उघड झाले आहे. आता पोलिसांच्या चौकशीदरम्यान, नागरिकांचा पैसा नाशिक येथील मित्राकडे ठेवलेला असल्याचा खुलासा मास्टरमाइंड संतोष राठोड याने केला आहे. या तपासासाठी ग्रामीण पोलीस नाशिक येथेही जाऊन आले. मात्र त्यांना काहीच मिळाले नाही. दरम्यान, जिल्हा सत्र न्यायालयाने संतोष उर्फ सचिन नामदेव राठोड याची 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी वाढवली आहे.

पोत्यात भरून घ्यायचा पैसे

शेंद्रा-बिडकीन डीएमआयसी प्रकल्पाअंतर्गत जमीन अधिग्रहित झालेल्या बिडकीन आणि परिसरातील गावांतील शेतकऱ्यांना शासनातर्फे चांगला मोबदला मिळाला होता. शेतकऱ्यांना एवढ्या पैशांचे काय करायचे, हा प्रश्न होता. हीच संधी साधून संतोष राठोडने या परिसरात 30-30 योजना राबवायला सुरुवात केली. केवळ 30-30 या नंबरवरून त्याने बिडकीन, पैठणमधील अनेक गावांतील शेतकऱ्यांवर भुरळ पाडली होती. याच नंबरचे मोबाइल, याच नंबरच्या कार घेऊन संतोष आणि त्याचे साथीदार सुटाबुटात येत असत आणि गावकऱ्यांना योजनेची माहिती सांगत असत. या सर्वांना भुललेल्या शेतकऱ्यांनी लाखो रुपये योजनेत गुंतवले असून मागील वर्षभरापासून त्यांना शून्य परतावा देण्यात आला आहे. तसेच त्यांची मुद्दलाची रक्कमही मिळालेली नाही. विशेष म्हणजे यातील बहुतांश व्यवहार लेखी स्वरुपात नाही. शेतकऱ्यांनी रोखीने पैसे द्यायचे, असा आग्रह असायचा.. त्यामुळे संतोष आणि त्याचे सहकारी लोकांचे पैसे चक्क पोत्यात भरून न्यायचे, असे गावकरी सांगतात. तसेच सुरुवातीच्या काळात त्याने लोकांना परतावा दिला. तेव्हा पैसे वाटण्यासाठीही तो पोत्यात भरूनच रक्कम आणायचा, अशी माहिती उघड झाली आहे.

अशी वाढली योजनेची व्याप्ती

कन्नड तालुक्यातील मुंडवाडी येथील रहिवासी संतोष राठोड याने 30 एप्रिल 2013 रोजी एक लाख रुपयांच्या बदल्यात 5 ते 7 हजार रुपये प्रतिमहिना परतावा देण्याची योजना सुरु केली होती. योजनेत पहिले तीन महिने परतावा मिळत नसे. चौथ्या महिन्यापासून ठरलेली रक्कम देण्यास सुरुवात केली जात होती. या योजनेतून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे जमा होऊ लागले. मार्च-एप्रिल 2021 मध्ये या योजनेला जास्त फुगवटा आला. ज्या शेतकऱ्यांनी दहा लाख गुंतवणूक केली त्यांना अडीच लाख रुपये मिळाले होते. एजंटांनी परताव्याचे पैसे दिल्यानंतर ते पैसे मूळ रकमेत जमा करण्यास सांगत. त्यामुळे एका महिन्यातच 10 लाखांचे साडेबारा लाख रुपये व्हायचे. त्यातून या घोटाळ्याची व्याप्ती 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.

योजनेचे बिंग कसे फुटले?

मार्च 2021 मध्ये ज्यांनी पुन्हा गुंतवणूक केली, त्यांना परतावा मिळाला नाही. ज्योती ढोबळे या महिलेने बिडकीन ठाण्यात 16 नोव्हेंबर 2021 रोजी तक्रार दिली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी संबंधित महिलेने तक्रार मागे घेतली. त्यामुळे संतोष राठोडला जामीन मिळाला. त्यानंतर 21 जानेवारी 2022 रोजी दौलत राठोड यांनी 33 लाख 50 हजार रुपयांना फसवल्याची दुसरी तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाल्यानंतर संतोष राठोड याला बेड्या ठोकल्या गेल्या.

पोलिसांसमोर तपासाची आव्हानं

दरम्यान, पोलीस कोठडीतील आरोपी संतोष राठोडने दिलेल्या माहितीवरून त्याचा नातेवाईक राजेंद्र देविदास पवार (सातारा परिसर) याच्याकडून पैशांचा हिशेब असलेल्या तीन डायऱ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यात मूळ गुंतवणूकदार कोण आहेत, तसेच मध्यस्थ एजंट कोण आहेत, याचा तपास सुरु आहे. डायरीत गुंतवणूकदाराला चेक आणि बाँड पेपर दिल्याचे नमूद आहे. ते चेक आणि बाँड पेपर जप्त करायचे आहेत. आरोपीच्या खात्यावर अनेक व्यवहार झाले आहेत. त्यात जमा झालेली रक्कम त्याने कोणत्या खात्यावर वर्ग केली, आरोपीच्या इतर बँक खात्यातील व्यवहार काय झाले, स्थावर-जंगम मालमत्तेची माहिती तपासणे, तसेच योजनेतील इतर साथीदारांचा तपास करणे आदी आव्हाने पोलिसांसमोर आहे.

इतर बातम्या-

Kalashtami 2022 | वर्षाची पहिली कालाष्टमी, काय आहे पूजेची विधी, शुभ मुहूर्त जाणून घ्या

शिवांगीनं आई बहिणीला वाचवलं, स्वयंम आणि जियाची क्रीडा क्षेत्रात कमाल; जुई केसकरच्या नवसंशोधनाचा राष्ट्रीय सन्मान

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.