धक्कादायकः औरंगाबादेत दुसरीतल्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या? मद्यधुंद बापानेच घात केल्याचा संशय

घरात ही मुलगी, तिची मोठी बहीण, आजी आणि वडीलच होते. आजी आणि मोठी बगीण कापूस वेचण्यासाठी शेतात गेले तर वडील घरी असताना तीन वाजेच्या सुमारास मुलीने गळफास घेतल्याचे कळले. त्यामुळे वडिलांवर संशय व्यक्त केला जात आहे.

धक्कादायकः औरंगाबादेत दुसरीतल्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या? मद्यधुंद बापानेच घात केल्याचा संशय
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 1:50 PM

औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यातल्या करमाड (Karmad, Aurangabad) परिसरात 8 वर्षीय चिमुकलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू (Suicide case) झाल्याचे समोर आले आहे. ही आत्महत्या असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असले तरीही या मुलीचे वय पाहता, ती आत्महत्या कशी करेल, असा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे या घटनेच्या वेळी मुलीचा बाप मद्यधुंद अवस्थेत आढळून (Aurangabad crime) आल्याने बापानेच काहीतरी घात केल्याची शंका नातेवाईकांना आहे.

मुलीच्या गळफासाने गोलटगावात खळबळ

औरंगाबाद जिल्ह्यातल्या करमाडमधील गोलटगाव येथील या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास गोलटगाव येथील घरात 8 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. सदर मुलीने गळफास घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र करमाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी मुलीचा बाप घरात मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. त्यामुळे बापानेच मुलीला मारल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी करमाड पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र काल उघड झालेल्या या घटनेनंतर संपूर्ण गावाला हादरा बसला आहे. सदर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. विच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच या घटनेतील सत्य उघड होईल.

आई दिवाळीनिमित्त माहेरी, घरात वडील, बहीण आणि आजी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी दुसऱ्या इयत्तेत शिकत होती. तिची आई काही दिवसांपूर्वी भाऊबीजेनिमित्त माहेर सोनक पिंपळगाव येथे गेली होती. त्यामुळे घरात ही मुलगी, तिची मोठी बहीण, आजी आणि वडीलच होते. आजी आणि मोठी बगीण कापूस वेचण्यासाठी शेतात गेले तर वडील घरी असताना तीन वाजेच्या सुमारास मुलीने गळफास घेतल्याचे कळले. दरम्यान गावातील पोलीस पाटलांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मुलीला घाटी रुग्णालयात दाखल केले असून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  .पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस एस. बनसोड करीत आहे.

औरंगाबादच्या नव्या बीडबायपास रोडवर अपघात, एकाचा मृत्यू

औरंगाबादः अन्य एका घटनेत शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या बीड बायपास रोडवर दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन या अपघातात राजेंद्र शंकर भादवे याचा मृत्यू झाला. हा अपघात नवीन बीड बायपास रोडवरील आडगाव पुलाजवळ घडला. आडगाव पुलाजवळ महानंदचे दूध घेऊन पिकअप जात होते. त्याच वेळी चारचाकी गाडीतून राजेंद्र हा घरी दूध घेऊन जात होता. दोन्ही वाहने भरधाव वेगात होती. त्यामुळे या धडकेत राजेंद्रच्या गाडीचा समोरचा भाग चक्काचूर झाला. गंभीर दुखापत झाल्याने राजेंद्रला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घेषित केले.

इतर बातम्या-

PHOTO: मराठवाड्यात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळलं, औरंगाबादेत डेपोत अर्धनग्र आंदोलन

अरेरे, गडबडच झाली हो… चोरी केलेल्या घरात चोर स्वतःचा मोबाइलच विसरला, औरंगाबाद पोलिसांकडून संशयित ताब्यात

 

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.