शिवसेनेचा भव्य शिवजयंती महोत्सव, तर भाजपचा गॅस पाइपलाईन कामाचा शुभारंभ; औरंगाबादेत शक्तीप्रदर्शनाची चढाओढ
शहरातील गॅसपाइपलाइनच्या कामाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री तथा नागरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होतील. यासह राज्यमंत्री रामेश्वर तेली हे प्रत्यक्ष सहभागी होऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करतील.
औरंगाबादः देशातील सर्वोच्च असा शिवाजी महाराजांचा पुतळा (Aurangabad ShivJayanti) औरंगाबादमधील क्रांती चौकात उभा करून त्याचं शिवजयंतीच्या दिवशी भव्य अनावरण करण्यात आलं. शहरात शिवसेनेच्या पुढाकारानं आयोजित केलेल्या या सोहळ्यानं औरंगाबादकरांचेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्र आणि देशातील शिवप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं औरंगाबाद शिवसेनेच्या (Shiv Sena) वतीनं मोठं शक्तीप्रदर्शनच करण्यात आलं. त्याच धर्तीवर आता भाजपच्या वतीने एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) स्वतः अत्यंत बारकाईने प्रत्येक गोष्टीचं नियोजन करत आहेत. त्यासाठी गेल्या चार दिवसांपासून बैठकांवर बैठका सुरु आहेत. पीएनजी योजनेअंतर्गत शहरातील गॅस पाइपलाइनच्या कामाचा भव्य शुभारंभ भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला चार केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. भाजपने शिवसेनेच्या शिवजयंती महोत्सवातील शक्ती प्रदर्शनाला उत्तर देण्यासाठी हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. आज बुधवारी सकाळी अकरा वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
संभाजीनगर दौऱ्यादरम्यान,शहरातील प्रत्येक स्तरावरील नागरिकांसाठी पीएनजी गॅस पाईपलाईन द्वारे स्वच्छ व सुलभ इंधन मिळवून देण्याचा प्रयत्न पंतप्रधान मा.श्री. @narendramodi जी यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. pic.twitter.com/IMZDk0Pvv3
— Dr Bhagwat Kishanrao Karad (@DrBhagwatKarad) February 28, 2022
ऐतिहासिक ठिकाणी भव्य कार्यक्रमाचे आयोजन
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने ज्या थाटात शिवजयंती साजरी केली, त्याच थाटात आता भाजप गॅस पाइपलाइनच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी सज्ज आहे, अशी चर्चा सुरु आहे. हा कार्यक्रम घेण्यासाठी भाजपने मराठवाडा सांस्कृतिक मंडळाची निवड केली. या ठिकाणी शिवसेनेच्या आतापर्यंत अनेक सभा गाजलेल्या आहेत. त्यामुळे याच मैदानावर भव्य मंडप भाजपच्या वतीने टाकला जाणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी मागील आठवडाभरापासून केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड बैठकांवर बैठका घेत आहेत.
4 केंद्रीय मंत्री, 60 हजार चौरस फुटांचा सभामंडप
शहरातील गॅसपाइपलाइनच्या कामाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री तथा नागरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होतील. यासह राज्यमंत्री रामेश्वर तेली हे प्रत्यक्ष सहभागी होऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. या कार्यक्रमासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचीही उपस्थिती राहील. या कार्यक्रमाच्या सभामंडपाचा एरिया 60 हजार चौरस फूट एवढा आहे. यात 40 बाय 10 फुटांची एक भव्य LED स्क्रीन असेल. तसेच आत बसलेल्या सर्व लोकांना व्यवस्थित आवाज यावा यासाठी दहा एलईडी स्क्रीन सभामंडपात लावण्यात आल्या आहेत.
घरोघरी 24 तास गॅस उपलब्ध राहण्याचे उद्दिष्ट
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी चार दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शहरात होऊ घातलेल्या गॅसपाइपलाइनची वैशिष्ट्य सांगितली. या योजनेद्वारे दोन लाख लोकांच्या घरात पाइपद्वारे गॅस पुरवठा करण्याचं ध्येय आहे. नंतर ही संख्या 10 लाखांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. 2024 ते 2025 पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास येईल, तसेच याद्वारे मिळणारा गॅस 30 ते 35 टक्के स्वस्त दरात मिळेल, असे आश्वासन डॉ. भागवत कराड यांनी दिलं आहे.
इतर बातम्या-