दुकान बंद करून घरी जाणाऱ्या सराफा व्यावसायिकाची गाडी अडवली, भर दुपारी लुटमार, औरंगाबादची घटना
मारहाण होत असताना अनेकांना काही तरुणांचे भांडण सुरु आहे, असे वाटले. काहींनी ते थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत चोरट्यांनी बॅग घेऊन पळ काढला. गुरुवारी दिवसभर खुलताबादपर्यंत पोलीस या लुटारूंचा शोध घेत होते.
औरंगाबादः दुपारच्या वेळी दुकान बंद करून घरी जाणाऱ्या सराफा व्यावसायिकाला भर रस्त्यात अडवून त्याला लुटल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत (Aurangabad) घडला. चार तरुणांनी या व्यावसायिकाला अडवून त्याला मारहाण केली. तसेच त्याच्याकड असलेली बॅग लुटून (Jewelry bag) नेली. यात चार तोळे दागिने होते, अशी माहिती व्यावसायिकाने दिली. शहरातील जटवाडा परिसरात भर दुपारी ही घटना घडली. ही मारहाण होत असताना अनेकांना काही तरुणांचे भांडण सुरु आहे, असे वाटले. काहींनी ते थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत चोरट्यांनी बॅग घेऊन पळ काढला. गुरुवारी दिवसभर खुलताबादपर्यंत पोलीस (Aurangabad police) या लुटारूंचा शोध घेत होते.
घटना काय घडली?
हर्सूल परिसरातील सारा वैभव येथे राहणाऱ्या शैलेश एकनाथ टाक यांचे काटशेवरी फाटा येथे कार्तिकी ज्वेलर्सचे दुकान आहे. ते दररोज दुचाकीवरून दुकानात ये-जा करतात. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी दुकान बंद करून ते घराकडे निघाले. दुकानात चोरी होईल, म्हणून ते रोजच सर्व दागिने घरी घेऊन जातात. त्या दिवशीदेखील संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास रसूलपुरा घाटाजवळील पुलावर जटवाडा रस्त्यावरून जाताना ही घटना घडली. त्यांच्या पाठीमागून काळ्या रंगाच्या युनिकॉर्न गाडीवर दोघांनी पाठलाग सुरु केला. काही अंतरानंतर शैलेश यांना धक्का मारून खाली पाडले. तेवढ्यात दबा धरून बसलेल्या अन्य दोघांनी त्यांना मारहाण केली. शैलेश यांच्याकडील दागिन्यांची पिशवी घेऊन या गुंडांनी पळ काढला. या प्रकरणी रात्री उशीरा हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
भर रस्त्यातील घटना
ही घटना घडली तेथे आसपास पेट्रोल पंप, ढाबे असूनही चोरट्यांनी लुटण्याची हिंमत केली. तसेच शैलेश यांना मारहाण होत असताना अनेकांना काही तरुणांचे भांडण सुरु आहे, असे वाटले. काहींनी ते थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत चोरट्यांनी बॅग घेऊन पळ काढला. गुरुवारी दिवसभर खुलताबादपर्यंत पोलीस या लुटारूंचा शोध घेत होते.
इतर बातम्या-