Aurangabad: भारतीय इतिहासाची कालखंडनिहाय मांडणी करणाऱ्या पुस्तकाचा गौरव, गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
औरंगाबादः भारतीय इतिहासाची प्रथमच कालखंडनिहाय व वर्षनिहाय मांडणी करणाऱ्या ‘आधुनिक भारताचा इतिहास- दी माइंड मॅप बुक’ या पुस्तकाची निर्मिती करणाऱ्या औरंगाबाद येथील वरद रवींद्र देशपांडे (Varad Deshpande) यांचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (Guinness Book of World Records) नोंदवण्यात आले आहे. त्यांना नुकतेच सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या पश्चिम भारत व दक्षिण […]
औरंगाबादः भारतीय इतिहासाची प्रथमच कालखंडनिहाय व वर्षनिहाय मांडणी करणाऱ्या ‘आधुनिक भारताचा इतिहास- दी माइंड मॅप बुक’ या पुस्तकाची निर्मिती करणाऱ्या औरंगाबाद येथील वरद रवींद्र देशपांडे (Varad Deshpande) यांचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (Guinness Book of World Records) नोंदवण्यात आले आहे. त्यांना नुकतेच सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या पश्चिम भारत व दक्षिण भारताच्या प्रमुख रेखा नागेंद्र सिंग यांच्या हस्ते हे सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले.
कशी आहे पुस्तकाची रचना?
वरद रवींद्र देशपांडे यांनी भारतीय इतिहासाची कालखंडनिहाय व वर्षनिहाय मांडणी केली आहे. तसेच आधुनिक भारताच्या इतिहासाची आवर्तसारणी तयार केली आहे. भूगोल विषय ज्या प्रकारे नकाशाच्या मदतीने अभ्यासायला सोपा जातो, त्याचप्रकारे इतिहास विषयात आवर्तसारणीच्या रुपात नकाशा उपलब्ध करून देऊन हा विषय सोप्या पद्धतीने अभ्यासला जावा, असा माझा प्रयत्न होता, असे वरद यांनी सांगितले. इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड संस्थेने या पुस्तकाचे योगदान घेऊन मला सन्मानित केले, याचा विशेष आनंद असल्याची प्रतिक्रिया वरद यांनी नोंदवली.
सहावी आवृत्ती प्रकाशनाच्या मार्गावर
वरद देशपांडे यांनी वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन केले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते 3 वर्षांपूर्वी त्यांच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. दुसरे पुस्तक ज्येष्ठ साहित्यिक शरद पोंक्षे यांच्या हस्ते प्रकाशित झाले. आतापर्यंत त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झाली असून आता सहावे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
इतर बातम्या-