हिंमत असेल तर नाव बदलून दाखवा ! सरकारी परिपत्रकात औरंगाबादचं संभाजीनगर होताच इम्तियाज जलील भडकले
राज्य शासनाच्या एका परिपत्रकात औरंगाबाद शहराचा उल्लेख औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर असा करण्यात आलाय. या उल्लेखानंतर एमआयएम पक्षाचे नेते तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील चांगलेच भडकले आहेत. त्यांनी हिंमत असेल तर शहराचे नाव बदलून दाखवा असं थेट आव्हान दिलं आहे
औरंगाबाद : राज्य शासनाच्या एका परिपत्रकात औरंगाबाद शहराचा उल्लेख औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर असा करण्यात आलाय. या उल्लेखानंतर एमआयएम पक्षाचे नेते तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील चांगलेच भडकले आहेत. त्यांनी हिंमत असेल तर शहराचे नाव बदलून दाखवा असं थेट आव्हान दिलं आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक काढलं त्याने राजीनामा द्यावा अशी मागणी जलील यांनी केली आहे. या प्रकारामुळे औरंगाबादेतील वातावरण तापण्याची शक्यता आहे.
हिंमत असेल तर शहराचं नाव बदलून दाखवा
औरंगाबाद शहराच्या नावावरुन मागील कित्येक वर्षांपासून मोठा वाद आहे. शिवसेना तसेच भाजपसारखे हिंदुत्ववादी पक्ष औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करतात. तर काँग्रेससारख्या पक्षाने औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याला विरोध केलेला आहे. फक्त शहराचे नाव बदलण्यापेक्षा पायाभूत सुविधांचा विकास व्हावा अशी भूमिका काँग्रेससारख्या पक्षांनी घेतलेली आहे. या पार्श्वभूमीवर आता एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका सरकारी परिपत्रकात औरंगाबाद शहराचा उल्लेख थेट संभाजीनगर अस करण्यात आलाय. मात्र हा प्रकार उघडकीस आल्यानंतर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक पवित्रा धरण केला आहे. जलील यांनी हिंमत असेल तर शहराचं नाव बदलून दाखवा, असं म्हणत थेट आव्हान दिलं आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक काढलं त्याने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीदेखील इम्तियाज जलील यांनी केली आहे.
सीएमओच्या ट्विटर हॅंडलवर संभाजीनगर उल्लेख
दरम्यान, यापूर्वीदेखील औरंगाबाद शहराच्या नावावरुन मोठा गजहब उडाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या @CMOMaharashtra या अधिकृत ट्वीटर हॅंडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला होता. त्यावरुनही थोरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विरोध दर्शवला होता. ‘महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते. भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे,’ असं ट्वीट थोरात यांनी केलं होतं. तर महाविकास आघाडीचे तीनही पक्ष एकत्र येऊन चर्चा केल्यानंतरच एखादा निर्णय घेतात. औरंगाबादच्या नामकरणाबाबतही तीन पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती
इतर बातम्या :
सोमय्या म्हणाले, राऊत कुणाचे प्रवक्ते, पवारांचे की ठाकरेंचे? आता राऊत म्हणाले, हा तर मोदींचा अपमान
VIDEO: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप नेत्याच्या कंपनीचा भ्रष्टाचार, राऊतांनी नावासह घोटाळा सांगितला
पोट सुटलेला सैफ अली खान, तर रंगीबेरंगी अवतारातील राणी मुखर्जी, ‘बंटी और बबली 2’ची पहिली झलक पाहिलीत?#RaniMukerji | #SaifAliKhan | #BuntyAurBabli2 | #Entertainment https://t.co/NYztMnXPGb
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 23, 2021
(aurangabad city mentioned as sambhajinagar in gr mp imtiaz jaleel opposes)