औरंगाबादमध्ये प्रत्येक झोनमधच्ये MRF केंद्र उभारणार, शहराच्या कचरामुक्तीसाठी काय आहे महापालिकेची योजना?

शहर पूर्णपणे कचार मुक्त करण्यासाठी महापालिका क्षेत्रातील प्रत्येक झोन अंतर्गत MRF म्हणजेच मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी सेंटर उभारणार असल्याची माहिती महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली. 

औरंगाबादमध्ये प्रत्येक झोनमधच्ये MRF केंद्र उभारणार, शहराच्या कचरामुक्तीसाठी काय आहे महापालिकेची योजना?
हर्सूल येथील प्लास्टिक अॅग्रीगेशन केंद्राचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 11:27 AM

औरंगाबादः शहर पूर्णपणे कचार मुक्त करण्यासाठी महापालिका (Aurangabad municipal Corporation) क्षेत्रातील प्रत्येक झोन अंतर्गत MRF म्हणजेच मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी सेंटर उभारणार असल्याची माहिती महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.  शहरातील हर्सूल येथे नुकतेच सुका कचरा वर्गीकरण व पुनर्प्राप्ती केंद्र तसेच प्लास्टिक अॅग्रीगेशन केंद्राचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या हस्ते झालेल्या या उद्घाटनाला आमदार अंबादास दानवे, औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, शहर अभियंता एस डी पानझडे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, कार्यकारी अभियंता डी के पंडित इको सत्वाच्या गौरी मिराशी व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

कचरामुक्त औरंगाबाद योजनेची वैशिष्ट्ये काय?

आगामी काळात औरंगाबाद शहर कचरा मुक्त करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली. पालकमंत्र्यांना सदर योजनेची माहिती त्यांनी हर्सूल येथील कार्यक्रमात दिली. त्यानुसार, योजनेतील वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे-

  1.  एम आर एफ केंद्रावर सुरुवातीला दररोज एक टन सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया सुरु करण्यात येईल.
  2. तीन महिन्यानंतर याची क्षमता वाढवून 10 टनांपर्यंत नेली जाईल.
  3. तसेच प्रत्येक झोन मध्ये एक असे एकूण नऊ एम आर एफ केंद्र उभारण्याचे मनपाचा मानस आहे.
  4.  सद्यस्थितीत कांचनवाडी, रामनगर, सेंट्रल नाका आणि आजपासून हर्सूल असे एकूण चार एम आर एफ केंद्र कार्यान्वित झाले आहेत.

भविष्यात 100 टन सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावणार- प्रशासक

प्रशासक पाण्डेय पुढे म्हणाले की, भविष्यात उरलेले पाच एम आर एफ केंद्र कार्यान्वित झाल्यावर सुमारे 100 टन सुका कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट शक्य होईल. याशिवाय कांचनवाडी येथे 30 मेट्रिक टन शमतेचे बायोमिथेनायझेशन प्लांट कार्यान्वित आहेत. याच बरोबर 150 मेट्रिक टन क्षमतेचे चिकलठाणा आणि पडेगाव कचरा प्रक्रिया केंद्र कार्यान्वित आहेत, 150 मेट्रिक टन क्षमतेचा हर्सूल कचरा प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झाल्यावर या तीन केंद्रावर एकूण 450 मेट्रिक टन कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल, तसेच 30 मेट्रिक टन कचऱ्यावर कांचन वाडी बायोमिथेनायझेशन प्लांट येथे प्रक्रिया केली जात आहे. याप्रकारे भविष्यात एकूण 480 मेट्रिक टन कचऱ्याची आणि 100 मेट्रिक टन सुका कचरा अशा 580 मेट्रिक टन कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे आणि शहर शून्य कचरा निर्मितीच्या मार्गावर आहे. सद्यस्थितीत शहरात दररोज सुमारे 425 मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. या प्रमाणे भविष्यात 2040 पर्यंत शहरात निघणारा 100 टक्के कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात शक्य होणार आहे आणि शहर कचरा मुक्त होणार आहे, प्रशासक पाण्डेय म्हणाले. यावेळी पालकमंत्री यांनी या नियोजनाचे कौतुक केले.

अडथळा आणणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा: पालकमंत्री

यावेळी पालकमंत्री महोदयांनी प्रगतीपथावर असलेले हर्सूल कचरा प्रक्रिया केंद्राचे कामाचा आढावा घेतला आणि पाहणी केली. सदरील कामात अडथळा निर्माण करणारे लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यावेळी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाला दिले.

इतर बातम्या-

Budget 2022: काय 7 वर्षांची परंपरा तुटणार ? करदात्यांना मिळणार अनोखी भेट?  कलम 80 सी अंतर्गत सुट मिळणार?

ओप्पोच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज…फास्ट चार्जिंग मोबाईलच्या जगात आता ओप्पो ठेवणार पाय, स्मार्टफोन झटपट चार्ज होणार!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.