Aurangabad Corona: विदेशातून आलेल्यांच्या महापालिकेचा दट्ट्या, 24 दिवसात आले एक हजार नागरिक!

देशात आणि राज्यात वाढता ओमक्रॉनचा प्रसार पाहता औरंगाबादेतही प्रशासन अलर्ट आहे. विदेशातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मागावर महापालिका असून पालिकेच्या वॉर रुममधून त्यांच्याशी संपर्क केला जात आहे. तरीही यातील बरेच जणा नॉट रिचेबल आहेत.

Aurangabad Corona: विदेशातून आलेल्यांच्या महापालिकेचा दट्ट्या, 24 दिवसात आले एक हजार नागरिक!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 10:23 AM

औरंगाबादः विदेशी प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना ओमिक्रॉनची बाधा असल्याचे राज्यातील उदाहरणांवरून दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून औरंगाबाद महापालिका शहरात आलेल्या प्रत्येक विदेशी नागरिकाच्या मागावर आहे. मागील 24 दिवसात शहरात 1 हजार 40 नागरिक आले. त्यापैकी 771 प्रवाशांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून 56 जणांचा शोध अद्याप लागला नाही.

1 डिसेंबरपासून सक्तीने विदेशींची चाचणी

शहरात ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेत आहे. त्यामुळे 1 डिसेंबरपासून विदेशातून येणारे पर्यटक आणि प्रवाशांची सक्तीने कोरोना चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत विदेशातून 1 हजार 40 प्रवासी शहरात दाखल झाले आहेत. त्यापैकी बाहेरदावी गेलेले 31 प्रवासी असून दुबार नावे असलेले 20 प्रवासी आहेत. मनपाच्या वॉर रुममधून संपर्क करण्याचा प्रयत्न केला तरी 107 प्रवाशांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. तसेच 56 प्रवाशांचा शोध अद्याप लागला नाही.

आतापर्यंत 771 प्रवासी निगेटिव्ह

आतापर्यंत 771 प्रवाशांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. एक प्रवासी मुंबईतच ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आल्याने त्याला मुंबईत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्या प्रवाशांसोबत औरंगाबादेत आलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. तसेच विदेशातून आलेल्या प्रवाशांमध्ये 33 मुलांचा समावेश आहे. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आलेली नाही. तसेच सहा प्रवासी ग्रामीण भागातील असून त्यांचीही चाचणी झालेली नाही. 54 प्रवाशांची चाचणी आणखी सात दिवसांनी करण्यात येणार आहे.

इतर बातम्या-

लग्नानंतर पीएफ खात्यात वारसाचे नाव कसे करावे अपडेट; जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया आणि नियम

TET Exam Scam| टीईटी परीक्षा महाघोटाळा ; आरोपी तुकाराम सुपेच्या घरी आढळले आणखी पाच लाख

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.