Aurangabad Corona: एक शिक्षक पॉझिटिव्ह, नामांकित शाळा तीन दिवस बंद, विद्यार्थी, स्टाफचीही चाचणी!

औरंगाबादेत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणच्या नामांकित शाळेतील क्रीडा शिक्षक पॉझिटिव्ह आल्याने पालकांची चिंता वाढली आहे. महापालिकेच्या पथकाने आता येथील विद्यार्थ्यांची अँटिजन व आरटीपीसीआर टेस्ट केलीय. तसेच शाळा तीन दिवस बंद ठेवण्यात आली आहे.

Aurangabad Corona: एक शिक्षक पॉझिटिव्ह, नामांकित शाळा तीन दिवस बंद, विद्यार्थी, स्टाफचीही चाचणी!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 11:55 AM

औरंगाबादः शहरातील मध्यवर्ती परिसरातील नामांकित शाळेतील क्रीडा शिक्षकाचा कोरोना चाचणी अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आल्याने (Corona Psitive) औरंगाबादेत खळबळ माजली आहे. यामुळे संबंधित शाळेतील शिक्षक आणि काही विद्यार्थ्यांचीही चाचणी करण्यात आली. तसेच पुढील तीन दिवस शाळेला सुटी देण्यात आली आहे. शहरात याच आठवड्यात 20 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र असा प्रकार घडल्यामुळे पालकांच्याही चिंतेत भर पडली आहे.

शाळा सुरु होण्यापूर्वी केली होती चाचणी

20 डिसेंबरपासून शाळा सुरु होणार असल्यामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या याही शाळेतील शिक्षकांची चाचणी करण्यात आली. सदर क्रीडा शिक्षकाची अँटिजन निगेटिव्ह आली, मात्र आरटीपीसीआरचा अहवाल बुधवारी प़ॉझिटिव्ह आला. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने ही माहिती मनपाला दिली.

352 विद्यार्थ्यांची अँटिजन, आरटीपीसीआर

20 डिसेंबरपासून 23 डिसेंबरपर्यंत सदर शिक्षकाचा मुलांशी थेट संपर्क आलेला नाही, असे म्हटले जात आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या काळजीसाठी मनपाने एक पथक पाठवून शाळेतील 352 विद्यार्थ्यांची अँटिजन, आरटीपीसीआर चाचणी केली. शुक्रवारी विद्यार्थ्यांच्या चाचणीचा अहवाल येणार आहे, अशी माहिती मनपा उपायुक्त संतोष टेंगळे यांनी दिली.

ताप-खोकला असल्यास आरटीपीसीआर सक्तीची

ओमिक्रॉनला शहरात येण्यापासून रोखण्यासाठी प्रशासनातर्फे कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी गुरुवारी नवी नियमावली जारी केली. प्रत्येक खासगी आणि सरकारी रुग्णालयात कोणतीही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी डॉक्टरांनी रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तसेच ताप किंवा सर्दीची लक्षणे दिसली तरीही रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करावी, असेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

इतर बातम्या-

अखेर ठरलं! विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 28 डिसेंबर रोजी; नवा अध्यक्ष कोण? राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं

लोकशाहीचे रक्षक असाल तर अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढवा, सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.