Aurangabad Corona: औरंगाबादमधील बाधितांचा आकडा वाढीच्या दिशेनेच! मराठवाड्यातील तीन जिल्हे रुग्णसंख्येत अग्रेसर

| Updated on: Jan 22, 2022 | 2:41 PM

काल शुक्रवारी औरंगाबाद शहरात 758 रुग्ण तर ग्रामीण भागात 391 रुग्ण आढळून आले. औरंगाबाद जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 58 हजार 941 झाली आहे. आजपर्यंत 1 लाखक 48 हजार 924 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Aurangabad Corona: औरंगाबादमधील बाधितांचा आकडा वाढीच्या दिशेनेच! मराठवाड्यातील तीन जिल्हे रुग्णसंख्येत अग्रेसर
Corona patients
Follow us on

औरंगाबादः जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या (Aurangabad corona) संख्येने तिसऱ्या दिवशीही हजारांचा आकडा पार केला. औरंगाबादमधील सक्रिय रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भरच पडत आहे. शुक्रवारी तब्बल 1 हजार 149 कोरोना बाधितांची भर पडली. तर मागील 24 तासात कोरोनामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला. शुक्रवारी दिवसभरात 512 जणांचे उपचार पूर्ण झाल्याने शहरातील 338 तर ग्रामीण भागातील 174 रुग्ण घरी घरी परतले. शहरात सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजार एवढी आहे. मराठवाड्याचा विचार करता, औरंगाबाद, लातूर आणि नांदेड हे तीन जिल्हे कोरोना रुग्णसंख्येत अग्रेसर असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील एकूण स्थिती काय?

काल शुक्रवारी औरंगाबाद शहरात 758 रुग्ण तर ग्रामीण भागात 391 रुग्ण आढळून आले. औरंगाबाद जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 58 हजार 941 झाली आहे. आजपर्यंत 1 लाखक 48 हजार 924 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

मराठवाड्यातील रुग्णसंख्या 4 हजारांवर

मराठवाड्यात गेल्या 24 तासात 4 हजार 55 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. औरंगाबादेत 1149, जालना जिल्ह्यात 284, परभणीत 37, नांदेडमध्ये 719, हिंगोलीत 137, बीडमध्ये 295 रुग्ण, लातूरमध्ये 771 रुग्ण तर उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण 323 रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान मराठवाड्यातील सात जिल्ह्यांत मृत्यूचे प्रमाण अत्यंत कमी असून कोरोना रुग्णांचा आकडाच फक्त वाढलेला दिसून येत आहे. प्रशासनाने लसीकरणावर मोठ्या प्रमाणवार भर दिल्याने नवीन रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण कमी आहे.

इतर बातम्या-

Crime | आधी घरच्यांना व्हिडीओ कॉल, नंतर टोकाचं पाऊल; 20 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Kiran Lohar | ‘गैरहजर असलेल्या Disale Guruji यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा कसा उंचावला?’