औरंगाबादेत शहरानंतर आता ग्रामीण भागात कोरोनाचा कहर, वैजापुरात पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ
औरंगाबादः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दिवसेंदिवस रुग्णसंख्येची लक्षणीय भर पडत आहे. जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात तब्बल 576 रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील रुग्णांची संख्या 382 तर ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या 191 एवढी नोंदली गेली. जिल्ह्यात गुरुवारी तिघांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर प्रथमच ग्रामीण भागातील नव्या रुग्णांची संख्या दोनशेच्या पुढे पोहोचली आहे. औरंगाबाद जिल्ह्याची स्थिती काय? औरंगाबाद […]
औरंगाबादः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दिवसेंदिवस रुग्णसंख्येची लक्षणीय भर पडत आहे. जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात तब्बल 576 रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील रुग्णांची संख्या 382 तर ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या 191 एवढी नोंदली गेली. जिल्ह्यात गुरुवारी तिघांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर प्रथमच ग्रामीण भागातील नव्या रुग्णांची संख्या दोनशेच्या पुढे पोहोचली आहे.
औरंगाबाद जिल्ह्याची स्थिती काय?
औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात आढळलेल्या रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे- शहर- 382 औरंगाबाद तालुका- 58 फुलंब्री- 8 गंगापूर- 51 कन्नड- 8 खुलताबाद- 4 सिल्लोड- 15 वैजापूर- 25 पैठण- 17 सोयगाव- 5
वैजापूर शहरासह, तालुक्यातील रुग्ण वाढले
वैजापूरात गुरुवारी एकाच दिवसात शहरात 15 आणि ग्रामीण भागात आठ रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने कोरोना निर्बंधाची कठोर अंमलबजावणी करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयात तालुका टास्क फोर्स नियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली. वैजापूर शहर व ग्रामीण परिसरात कोरोना प्रभावात वाढ होत असल्याने प्रशासकीय यंत्रणेने रुग्ण संख्येत वाढ होवू नये, यासाठी सतर्क रहावे, असे आमदार रमेश बोरनारे यांनी यंत्रणेला बजावले.
शाळा सुरु करण्याची संस्थांची मागणी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र मॉल, चित्रपटगृह, नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने सुरु आहेत. तर विद्यार्थ्यांसाठीही 50 टक्के क्षमतेने शाळा का सुरु होत नाहीत? 25 जानेवारीपर्यंत शाळा सुरु करण्याची परवानगी द्या, अन्यथा असहकार चळवळ सुरु करू, असा इशारा इंग्रजी शाळा संघटनेने दिला आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
इतर बातम्या-