AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Corona | बेड्सची उपलब्धता ते कोरोना चाचणी केंद्र, औरंगाबादमधील कोरोनाची स्थिती काय?

औरंगाबादमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा रुग्णालयासह इतर केंद्रांची माहिती आयसीएमआरच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. (Aurangabad covid19 corona cases test report)

Aurangabad Corona | बेड्सची उपलब्धता ते कोरोना चाचणी केंद्र, औरंगाबादमधील कोरोनाची स्थिती काय?
कोरोना चाचणी
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 4:37 PM

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. औरंगाबाद महापालिका क्षेत्रात (Aurangabad Corona) काल 946 नवे रुग्ण सापडले, तर 5 कोरोनाबाधितांना प्राण गमवावे लागले आहेत. औरंगाबादमधील सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या 17 हजारांच्या वर गेली आहे. आतापर्यंत औरंगाबाद महापालिका क्षेत्र धरुन जिल्ह्यात 92 हजारांपेक्षा जास्त व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. तर 72 हजार 754 रुग्ण उपचारांनंतर बरे झाले आहेत. मात्र 1400 हून अधिक कोरोनाग्रस्त दगावले आहेत. उपचारासाठी खाजगी आणि सरकारी रुग्णालयात बेड मिळत नसल्याने रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Aurangabad covid19 corona cases test corona report corona dashboard how to get covid bed in Aurangabad all you need to know)

बेड्सविषयी माहिती कशी मिळवाल?

http://www.aurangabadmahapalika.org या औरंगाबाद महापालिकेच्या वेबसाईटवर बेड्सची माहिती मिळवण्यासाठी माझी हेल्थ माझ्या हाती (MHMH – Mazi Health Mazya Hati) हे अॅप डाऊनलोड करण्याची लिंक देण्यात आली आहे.

https://aurangabad.gov.in/ या वेबसाईटवर 1921 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास सेल्फ असेसमेंट करणारा कॉल बॅक येईल, अशी माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे. आरोग्यसेतू अॅप प्रमाणे तुमच्या प्रकृतीविषयी रेकॉर्डेड कॉलमधून प्रश्न विचारण्यात येईल आणि तुमच्या आरोग्याची माहिती देणारा एसएमएस पाठवला जाईल, असेही यात नमूद करण्यात आले आहे. परंतु 1921 वर मिस्ड कॉल दिल्यानंतर कोणताही कॉल बॅक अर्ध्या तासाच्या आत आला नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांनी कुठे संपर्क करायचा हा प्रश्न आहे.

औरंगाबादमध्ये कोरोना चाचणी कशी होते? (How to do corona test in Aurangabad)

औरंगाबादमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा रुग्णालयासह इतर केंद्रांची माहिती आयसीएमआरच्या वेबसाईटवर (https://covid.icmr.org.in/) उपलब्ध आहे. याशिवाय खासगी लॅबमध्येही कोव्हिड चाचणी उपलब्ध आहे.

कुठे कुठे चाचणी (प्रमुख केंद्रे) 

– कमलनारायण बजाज हॉस्पिटल पॅथॉलॉजी लॅब, औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद – एमजीएम सेंट्रल पॅथॉलॉजी लॅब, औरंगाबाद (चाचणीला जाण्यापूर्वी 1075 क्रमांकावर उपलब्धता पाहावी)

औरंगाबादमध्ये टेस्ट कशी होते, किती वेळ लागतो, रांगा आहेत का?

औरंगाबादमध्ये RTPCR आणि अँटिजन टेस्ट केली जाते. अहवाल येण्यासाठी 24 ते 48 तास लागतील, असं सांगितलं जातं. (Aurangabad covid19 corona cases test report)

एखाद्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर रुग्णाने कुठे जायचं?

रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला सौम्य लक्षणं असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गृह विलगीकरणात राहता येते. लक्षणे जास्त असल्यास कोव्हिड केअर सेंटरला भरती करण्यात येते.

रुग्णांना कुठे पाठवलं जातं? कोव्हिड सेंटर किंवा तत्सम

ज्यांना खाजगी रुग्णालयात जायचं असेल ते तिकडे जाऊ शकतात किंवा मग कोव्हिड केअर सेंटर उभारले आहेत.

संबंधित बातम्या :

मुंबईत आहात आणि तुमची चाचणी पॉझिटीव्ह आली, काय करायचं? ‘या’ नंबर संपर्क करा

नाशिक पालिकेचं कोरोनासाठी पोर्टल; बेड , रेमडेसिव्हीर कुठे आणि कसं मिळणार, हेल्पलाईन नंबरही जारी

Nagpur Corona : नागपूरमधील कोरोना रुग्णांसाठी आवश्यक माहिती

(Aurangabad covid19 corona cases test corona report corona dashboard how to get covid bed in Aurangabad all you need to know)

पाणी बंद करण्याचा विचार जरी.., शाहबाज शरीफ यांची फुसकी धमकी
पाणी बंद करण्याचा विचार जरी.., शाहबाज शरीफ यांची फुसकी धमकी.
पाकची अवस्था भेदरलेल्या कुत्र्यासारखी, शेपूट घालून पळापळ अन् याचना...
पाकची अवस्था भेदरलेल्या कुत्र्यासारखी, शेपूट घालून पळापळ अन् याचना....
पाकिस्तानने पत्र पाठवल्यानंतरही पाकची 'ती' विनंती भारतानं धुडकवली
पाकिस्तानने पत्र पाठवल्यानंतरही पाकची 'ती' विनंती भारतानं धुडकवली.
आम्ही पाकिस्तानी नाही, बलुचिस्तानी! बलुचिस्तानची स्वातंत्र्याची घोषणा
आम्ही पाकिस्तानी नाही, बलुचिस्तानी! बलुचिस्तानची स्वातंत्र्याची घोषणा.
सोफिया कुरेशींबद्दल वक्तव्य, भाजप मंत्र्यावर गुन्हा अन् कोर्टात धाव
सोफिया कुरेशींबद्दल वक्तव्य, भाजप मंत्र्यावर गुन्हा अन् कोर्टात धाव.
पाकिस्तानच्या विरोधात पाऊल उचला, आम्ही..; बलुचिस्तानची मोठी घोषणा
पाकिस्तानच्या विरोधात पाऊल उचला, आम्ही..; बलुचिस्तानची मोठी घोषणा.
वादळी वाऱ्यासह अवकाळीच्या सरी बरसणार, मुंबईसह राज्यात सतर्कतेचा इशारा
वादळी वाऱ्यासह अवकाळीच्या सरी बरसणार, मुंबईसह राज्यात सतर्कतेचा इशारा.
दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक; त्रालमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा
दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक; त्रालमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा.
गुडघे टेकून फोन केला म्हणून युद्धविराम - मुख्यमंत्री फडणवीस
गुडघे टेकून फोन केला म्हणून युद्धविराम - मुख्यमंत्री फडणवीस.
बलुच आर्मीकडून पाकिस्तानी लष्करावर पुन्हा हल्ला, 14 सैनिकांना केलं ठार
बलुच आर्मीकडून पाकिस्तानी लष्करावर पुन्हा हल्ला, 14 सैनिकांना केलं ठार.