Aurangabad | जिल्ह्यातील 86 रस्त्यांच्या कामांना मंजुरी, 17 कोटींची कामं, कोणत्या तालुक्याला किती निधी?

| Updated on: Apr 17, 2022 | 6:00 AM

रस्त्यांचे मजबुतीकरण आणि पुलांची नव्याने बांधणी करणे गरजेचे असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेने शासनाला सादर केला होता. त्यातील 86 कामांना मंजुरी मिळाली आहे.

Aurangabad | जिल्ह्यातील 86 रस्त्यांच्या कामांना मंजुरी, 17 कोटींची कामं, कोणत्या तालुक्याला किती निधी?
सांकेतिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबाद : जिल्ह्यातील (Aurangabad District) ग्रामीण भागातील रस्ते सुधारण्याची मोहीम जिल्हा परिषदेने (Aurangabad ZP) हाती गेतली आहे. जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या विकास निधीद्वारे ही कामे केली जातील. जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीकडून कार्यकाळ संपण्यापूर्वीच 17 कोटी 81 लाख रुपयांतून जिल्ह्यातील 86 ग्रामीण रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण करणार येणार आहेत. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) काही तालुक्यातील रस्ते आणि पूल वाहून गेले होते. अनेक गावांशी संपर्क तुटला होता. सध्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाने डागडुजी करून तात्पुरते मार्ग सुरु केले आहेत. मात्र रस्त्यांचे मजबुतीकरण आणि पुलांची नव्याने बांधणी करणे गरजेचे असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेने शासनाला सादर केला होता. त्यातील 86 कामांना मंजुरी मिळाली आहे.

कोणत्या मार्गासाठी किती निधी?

  1.  जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीने फुलंब्री तालुक्यातील 13 रस्त्यांच्या कामासाठी सर्वाधिक 3 कोटी 47 लाख निधी मंजूर केला आहे.
  2. औरंगाबाद तालुक्यातील 16 रस्त्यांच्या कामासाठी मंजुरी मिळाली असून यासाठी 19 लाख रुपये मंजूर केले आहेत.
  3. पैठण तालुक्यातील 12 रस्त्यांसाठी 2 कोटी 63 लाख रुपयांचा निधी देण्यात आला.
  4. गंगापूर तालुक्यातील 10 रस्त्यांना एक कोटी 41 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
  5. सिल्लोड तालुक्यातील 8 रस्त्यांसाठी 1 कोटी 41 लाख रुपयांचा निधी
  6. सोयगाव तालुक्यातील 5 रस्त्यांच्या कामासाठी 93 लाख रुपये निधी
  7. खुलताबाद तालुक्यातील 6 रस्त्यांच्या कामासाठी 94 लाख रुपये
  8. वैजापूर तालुक्यातील 6 रस्त्यांसाठी 1 कोटी 75 लाख रुपये
  9.  कन्नड तालुक्यातील 10 रस्त्यांसाठी 1 कोटी 67 लाख रुपये मंजूर करण्यात आले

इतर बातम्या-

Aurangabad PHOTO : औरंगाबादेत मनसेच्या वतीने हनुमान चालीसाचे सामुहिक वाचन, पुस्तिकाही वाटप

Aurangabad | मित्राच्या मदतीने थाटला नवाच उद्योग, भाड्याने कार घ्यायच्या अन् गहाण ठेवायच्या, पुंडलिक नगरात काय प्रकार?