Aurangabad | तुम्ही विधानसभेत ठराव घ्या, केंद्रात आम्ही लढू, डॉ. कराडांचं शिवसेनेला आव्हान, औरंगाबादेत पुन्हा ‘संभाजीनगर’ चा मुद्दा!

औरंगाबादचं नाव बदलण्यावरून मनसेनंही शिवसेनेला डिवचलं. आज शहरात गुलमंडी परिसरात मनसेतर्फे शिवसेनेला डिवचण्यासाठी बॅनरबाजी करण्यात आली.

Aurangabad | तुम्ही विधानसभेत ठराव घ्या, केंद्रात आम्ही लढू, डॉ. कराडांचं शिवसेनेला आव्हान, औरंगाबादेत पुन्हा 'संभाजीनगर' चा मुद्दा!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 4:27 PM

औरंगाबादः शिवसेनेनं विधानसभेत संभाजीनगर (Sambhaji Nagar) नावाचा ठराव घ्यावा आणि केंद्रातून हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं वक्तव्य करून डॉ. भागवत कराडांनी (Dr. Bhagwat Karad) पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलंय. औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्यावरून भाजपनं पुन्हा एकदा शिवसेनेकडे (Shiv Sena) चेंडू टोलवला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचा संभाजीनगर नामांतराचा अजेंडा आहे. मात्र मुस्लिम मतदारांना दुखावून हा निर्णय घेण्याचं धाडस अद्याप एकानेही दाखवलेलं नाही. दरवेळी निवडणुका आल्या की हा मुद्दा उकरून काढला जातो. निवडणुका झाल्या ही मुद्दा गुंडाळून ठेवला जातो. आता पुन्हा महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्याने भाजपने या मुद्द्यावरून राज्य सरकारमधील शिवसेनेला डिवचलं आहे.

काय म्हणाले डॉ. भागवत कराड?

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि औरंगाबाद भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. भागवत कराड यांनी आज संभाजी महाराज जयंती निमित्त त्यांना अभिवादन केलं. तसंच कोणत्याही स्थितीत या शहराला ‘संभाजीनगर’ शहराला हे नाव मिळालं पाहिजे, अशी मागणी केली आहे. महाविकास आघाडी सरकारने विधानसभेत हा ठराव घ्यावा आणि तो केंद्राकडे पाठवावा. आम्ही तेथे प्रयत्न करून हा मु्द्दा मार्गी लावू, असं डॉ. कराड म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘संभाजीनगर’ वरून मनसेची बॅनरबाजी

औरंगाबादचं नाव बदलण्यावरून मनसेनंही शिवसेनेला डिवचलं. आज शहरात गुलमंडी परिसरात मनसेतर्फे शिवसेनेला डिवचण्यासाठी बॅनरबाजी करण्यात आली. तमाम हिंदूंचं स्वप्न मनसे पूर्ण करणार. शिवसेनेचा गड असलेल्या गुलमंडीवर मनसेनं अशी बॅनरबाजी केली आहे. त्यामुळे आता शिवसेना याला कसं प्रत्युत्तर देतेय, हे पहावं लागेल.

‘खासदार इम्तियाज जलील यांना धिक्कार’

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी दोन दिवसांपूर्वी खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घ्यायला गेले होते. यावरून शिवसेना, भाजपतर्फे तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. डॉ. कराड यांनीही खासदार जलील यांचा निषेध केला. ते म्हणाले, ‘ लोकांनी ज्या खासदाराला निवडून दिलं, त्याने औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन दर्शन घेतलं. अशा खासदाराचा मी निषेध करतो. धिक्कार करतो. दोन महिन्यांपूर्वीच आम्ही तिथलं दर्शन घेत नाहीत, असं त्यांनी सांगितलं होतं. यासाठी आमच्या युवा मोर्चातर्फे आंदोलनही करण्यात आलं. हे आंदोलन आम्ही आणखी तीव्र करणार आहोत. ‘

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.