Aurangabad: औरंगाबाद ते वाळूज अखंड उड्डाण पुलाचा प्रस्ताव पुढे सरकतोय, डॉ. कराड यांचे नितीन गडकरींना निवेदन

नागपूर-नाशिकच्या धर्तीवर औरंगाबाद शहरातही चिकलठाणा ते वाळूज दरम्यान अखंड पूल बांधण्याचा बहुचर्चित प्रस्ताव डॉ. भागवत कराड यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर ठेवला.

Aurangabad: औरंगाबाद ते वाळूज अखंड उड्डाण पुलाचा प्रस्ताव पुढे सरकतोय, डॉ. कराड यांचे नितीन गडकरींना निवेदन
विकासकामांचा प्रस्ताव सादर करताना औरंगाबाद येथील शिष्टमंडळ
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 10:14 AM

औरंगाबादः शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि बहुचर्चित असा औरंगाबाद ते वाळूज अखंड उड्डाणपुलाचा प्रस्ताव हळू हळू पुढे पडत असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळलाने नवी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत औरंगाबाद शहरातील चिकलठाणा ते वाळूजपर्यंत अखंड पूल, नगर नाका-माळीवाडा ते वेरूळ या रस्त्याचे रुंदीकरण, औरंगाबाद-वैजापूर-शिर्डी मार्ग चौपदरीकरणाच्या मागण्यांचे निवेदन गडकरींना दिले.

.. तर शेंद्रा-वाळूज एमआयडीसी जोडली जाणार

चिकलठाणा ते वाळूज हा बहुचर्चित अखंड पुलाचा प्रस्ताव हळू हळू शासकीय फायलींद्वारे पुढे सरकतोय. मात्र तो प्रत्यक्षात अस्तित्वात आला तर शहरातील वाहतुकीची मोठी कोंडी दूर होईल. शहरातील मुख्य रस्ता असलेल्या जालना रोडवर चिकलठाणा ते वाळूजपर्यंत पूल झाला तर शेंद्रा आणि वाळूज या दोन औद्योगिक वसाहतींना थेट एकत्र जोडण्यात येईल. तसेच शहरातील मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल, याकडे डॉ. भागवत कराड यांनी नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले.

शहर विकासासाठी आणखी कोणत्या मागण्या

डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वात औरंगाबाद येथील शिष्टमंडळाने इतरही रस्ते विकास कामांचे प्रस्ताव नितीन गडकरी यांच्यासमोर ठेवले. या शिष्टमंडळात वैजापूरचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते, उद्योजक राम भोगले यांचा समावेश होता. त्यांनी पुढील विकासकामांचे निवेदन दिले.- नगरनाका- माळीवाडा-दौलताबाद टी पॉइंट ते थेट वेरूळपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. कारण सध्याचा रस्ता अरुंद असल्यामुळे इथे अपघातांची मालिकाच सुरु आहे. तसेच माळीवाड्यापर्यंत शहराचा विस्तार झाल्यामुळे तेथेही नागरिकांची वर्दळ असते. म्हणून रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. औरंगाबाद-वैजापूर- शिर्डी या मार्गाचेदेखील चौपदीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. पर्यटनाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असल्याने तसेच शिर्डी देखील राष्ट्रीय पातळीवरचे धार्मिक स्थळ असल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. त्यामुळे भाविकांना सध्याचा दुपदरी रस्ता कमी पडतो. या रस्त्याचेही रुंदीकरण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

इतर बातम्या-

Mumbai : मुंबई विद्यापीठाच्या जागेवरील एसआरए प्रकल्प बंद पाडला, भूखंड ताब्यात घेतल्यास राजीनामा देईन-सामंत

करण जोहरच्या ‘त्या’ पार्टीत सरकारचा मंत्री होता का?; आशिष शेलारांची शंका

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.