Ellora Caves | वेरुळ लेणीचं सौंदर्य पाहण्यासाठीची पायपीट टळणार, औरंगाबादेत बॅटरीवर चालणारी इको फ्रेंडली वाहनं येणार!

ही सेवा 1 जानेवारीपासूनच सुरु करण्याचा पुरातत्त्व खात्याचा विचार होता. मात्र तांत्रिक कारणांमुळे ते शक्य नाही झाले. आता पुढील महिन्यात लेणी परिसरात ही बॅटरीवरील वाहने धावतील. लेणी मार्गावर 5 ठिकाणी बस स्टॉप उभारले जातील.

Ellora Caves | वेरुळ लेणीचं सौंदर्य पाहण्यासाठीची पायपीट टळणार, औरंगाबादेत बॅटरीवर चालणारी इको फ्रेंडली वाहनं येणार!
वेरुळ लेणी, औरंगाबाद
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 3:00 AM

औरंगाबादः जागतिक ख्यातीच्या वेरुळ लेणीचं (Ellora Caves) सौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना (Tourist in Aurangabad) संपूर्ण लेणी फिरण्यासाठी बराच मोठा फेरा मारावा लागतो. हे अंतर जवळपास 2.2 किलोमीटरचे आहे. बऱ्याच वेळा याच कारणास्तव काही पर्यटक लेणीत येण्याचं टाळतात किंवा प्रमुख काही लेण्यांचा अनुभव घेऊन परत फिरतात. मात्र पर्यटकांची ही अडचण समजून घेत भारतीय पुरातत्त्व खात्याने (Indian Archaeological department) लेणी परिसरात फिरण्यासाठी बॅटरीवर चालणारी वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात एसी आणि नॉन एसी 20 वाहने घेतली जातील. त्यासाठी 30 ते 40 रुपयांचे तिकीट लागेल. या वाहन खरेदीसाठीचे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.

34 लेणी पाहताना पर्यटकांची दमछाक

वेरुळमधील शिल्पांचे सौंदर्य अनुभवायचे असेल तर प्रत्येक लेणीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. मात्र एकूण 34 लेणींचं हे अंतर जवळपास 2.2 किलोमीटरचं आहे. याठिकाणी एसटी महामंडळाची बस धावते, मात्र अजिंठा लेणीप्रमाणे वेरुळ लेण्यांमधली बस प्रदुषणमुक्त नसल्याने लेणीला धोका निर्माण होतो. यावर पर्याय म्हणून पुरातत्व खाते आता वेरुळमध्येही बॅटरीवर चालणारी पर्यावरणपूरक वाहने खरेदी करणार असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक डॉ. मिलनकुमार चावले यांनी दिली.

कशी असतील नवी वाहने?

वेरुळ लेण्यांना भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांना एका लेणीपासून दुसऱ्या लेणीपर्यंत ने-आण करण्याचे काम बॅटरीवर चालणारी 20 वाहने करतील. यात 5 एसी आणि 15 नॉन एसी वाहने असतील. एसी वाहनात 7, तर साध्या वाहनांत 15 आसन क्षमता असेल. लेणीच्या तिकिटाशिवाय वाहनासाठी वेगळे तिकीट घ्यावे लागेल. ते ऐच्छिक असेल. पर्यटकांना पायी लेणी बघण्याचा पर्यायही खुला राहील. वाहनासाठी 30 ते 40 रुपयांदरम्यान तिकीट लागेल. एकदा चिकिट काढल्यावर ते दिवसभर चालेल. एका वाहनातून एका लेणीत गेल्यावर पुढील लेणीसाठी दुसऱ्या वाहनात बसता येईल.

पुढील महिन्यापर्यंत वाहने येणार

ही सेवा 1 जानेवारीपासूनच सुरु करण्याचा पुरातत्त्व खात्याचा विचार होता. मात्र तांत्रिक कारणांमुळे ते शक्य नाही झाले. आता पुढील महिन्यात लेणी परिसरात ही बॅटरीवरील वाहने धावतील. लेणी मार्गावर 5 ठिकाणी बस स्टॉप उभारले जातील. लेणी परिसराच्या बाहेर ही वाहने उभी करण्यासाठी खास डेपोसारखी जागा दिली जाईल. येथेच त्यांचे चार्जिंग स्टेशन असेल. खासगी कंत्राटदारांमार्फत ही वाहने चालवली जातील.

इतर बातम्या-

दलित, वंचित, शोषित, गरिबांसाठी काय केलं? समानतेचा संदेश देणाऱ्या मूर्तीचं अनावरण करताना मोदींचं उत्तर

Statue Of Equality : रामानुजाचार्य यांची विशाल मूर्ती ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’च्या रुपात आपल्याला समानतेचा संदेश देतेय- मोदी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.