Aurangabad| हर्सूल जलशुद्धीकरण केंद्र आज बंद, दिल्ली गेट जलकुंभावरील पाणीपुरवठा विस्कळीत

हर्सूल तलावालगतच्या जटवाडा रोडपासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या जलवाहिनीवर क्रॉस कनेक्शन घेण्यासाठी शनिवारी एक दिवासाचा शटडाऊन घेण्यात येत आहे.

Aurangabad| हर्सूल जलशुद्धीकरण केंद्र आज बंद, दिल्ली गेट जलकुंभावरील पाणीपुरवठा विस्कळीत
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 8:42 AM

औरंगाबादः शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा (Water supply) सुरळीत होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर सूचना दिल्या आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी आणि चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी मनपा प्रशासन (Aurangabad municipal corporation) प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून हर्सूल तलावातून (Harsul lake) जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत 350 मिमी व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात येत आहे. या वाहिनीवर क्रॉस कनेक्शन घेण्यासाठी 04 मे रोजी हर्सूल जलशुद्धीकरण केंद्र दिवसभर बंद ठेवले जाणार आहे. त्यामुळे दिल्ली गेट जलकुंभावरील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.

हर्सूल तलावातून पाणी उपसा वाढवण्याचे नियोजन

शहराच्या पाणीपुरवठ्यात वाढ करण्यासाठी मनपाने हर्सूल तलावातून 5 ऐवजी 10 एमएलडी पाण्याचा उपसा करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी हर्सूल तलावालगतच्या जटवाडा रोडपासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या जलवाहिनीवर क्रॉस कनेक्शन घेण्यासाठी शनिवारी एक दिवासाचा शटडाऊन घेण्यात येत आहे. या काळात हर्सूल जलशुद्धीकरण केंद्र बंद राहणार आहे. त्यामुळे दिल्लीगेट जलकुंभाला दिवसभर पाणीपुरवठा होणार नाही. तसेच परिसरातील नागरिकांना एक दिवस उशीराने पाणीपुरवठा होऊ शकतो.

अवैध नळजोडणी थांबवली

शहरातील अनधिकृत नळजोडणी तोडण्यासाठी मनपाने मोठी मोहीम हाती घेतली होती. मनपाच्या पथकाला शहरात हजारो अनधिकृत नळ दिसून आले. पहाडसिंगपुरा, लक्ष्मी कॉलनी, शांतीपुरा, शहानूरमियाँ दर्गा, पडेगाव भागात पाहणी केली असता या पाचच वसाहतीत 2000 अनधिकृत नळ दिसले. ते कापण्यासाठी दोन वेळा मुहूर्त ठरवण्यात आला. मात्र पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याचे कारण देत मनपाने ही मोहीम काही दिवस थांबवली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी नळतोडणी थांबवली?

दरम्यान, येत्या 08 जुन रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा होत आहे. त्यामुळे शहरात हजारो अनधिकृत नळ असल्याचे दिसून आल्यानंतरही सभेपूर्वीच नागरिकांचा रोष नको म्हणून मनपाने ही नळतोडणी थांबवल्याचे दिसून येत आहे. ही कारवाई झाली तर नागरिकांचा संताप होऊ शकतो आणि त्याचे पडसाद सभेवर उमटू शकतात. त्यामुळे सध्या तरी मनपाने नरमाईचं धोरण स्वीकारलेलं दिसतंय.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.