PHOTO | विद्यार्थ्यांनी फुला-पानांपासून तयार केले नैसर्गिक रंग, Aurangabad मनपा शाळेत Holi Celebration
बालवाडीतील विद्यार्थ्यांनी देखील पिचकाऱ्यांद्वारे रंग उडवून आनंद व्यक्त केला. मनपाचे सांस्कृतिक अधिकारी तथा शाळेचे मुख्याध्यापक संजीव सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला.
औरंगाबादः शहरात सर्वत्रच होळी आणि धुळवडीचा (Dhulivandan) उत्साह दिसून येत आहे. तब्बल दोन वर्षानंतर लहान मुले रंग खेळण्यासाठी उत्सुक आहेत. शहरात धुळवडीच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शाळांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये गुरुवारीच विद्यार्थ्यांनी धुळवडीचा (Holi celebration) आनंद लुटला. महापालिकेच्या (Aurangabad municipal corporation) इंदिरानगर येथील प्रियदर्शनी शाळेतदेखील धुळवड साजरी करण्यात आली. मनपा केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रियदर्शनी शाळेत विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक होळी साजरी केली. वसंत ऋतूत फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला येणाऱ्या या सणाचं महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आलं. तसेच निसर्गातीलच फुलं आणि पानांपासून नैसर्गिक रंग कसे तयार करायचे हेदेखील विद्यार्थ्यांना शिकवण्यात आलं.
विद्यार्थ्यांनी पानाफुलांपासून नैसर्गिक रंग तयार केले. कोरड्या रंगाचा वापर करत गाण्याच्या तालावर विद्यार्थ्यांनी होळी खेळण्याचा आनंद लुटला.
बालवाडीतील विद्यार्थ्यांनी देखील पिचकाऱ्यांद्वारे रंग उडवून आनंद व्यक्त केला. मनपाचे सांस्कृतिक अधिकारी तथा शाळेचे मुख्याध्यापक संजीव सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेखा महाजन, शशिकांत उबाळे,शोभा निकम, रश्मी होनमुटे, मीरा मोरे, प्रतिभा गावंडे, सुनिता जोशी, मनीषा नगरकर, तेजस्विनी देसले, स्वाती डिडोरे, संगीता चौधरी, सूर्यमाला जाधवर, किरण पवार, प्रकाश इंगळे आदींनी परिश्रम घेतले.
इतर बातम्या-