Aurangabad | खिडकी फोडून घुसले चोर, परदेशात गेलेल्या संस्थाचालकांच्या घरातून अर्धा कोटी किंमतीचा माल लंपास

चोराने खिडकीची ग्रील काढून घरात प्रवेश केला. कपाटाचे लॉक तोडून सर्व ऐवज नेला. तसेच जाताना समोरस असलेल्या कॅमेऱ्यांचा डीव्हीआरही नेला.

Aurangabad | खिडकी फोडून घुसले चोर, परदेशात गेलेल्या संस्थाचालकांच्या घरातून अर्धा कोटी किंमतीचा माल लंपास
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 10:35 AM

औरंगाबादः नेदरलँड येथे सहलीला गेलेल्या डॉक्टर कुटुंबाचा सिडको एन-1 येथील बंगला फोडून चोरट्यांनी (Theft) तब्बल अर्धा कोटी रुपये किंमतीचा माल लंपास केला. यात 45 ते 50 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे आणि हिरेजडित दागिने (Gold jewelry) तसेच काही रोख रकमेचा समावेश होता. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. बंगल्याच्या समोरील बाजूच्या लोखंडी ग्रिलचे खिळे काढून चोराने आत प्रवेश केला. 26 मे ते 31 मे दरम्यान नेदरलँडला गेलेल्या डॉ. संजय तोष्णीवाल यांच्या सिडको एन-1 येथील घरात ही चोरी झाली. तोष्णीवाल यांच्या शिक्षण संस्था आहेत.  शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सदर घटनेची माहिती दिली. 31 मे रोजी मुंबईतून औरंगाबादेत आल्यानंतर घराची स्थिती पाहून त्यांनी ताबडतोब पोलिसांना (Aurangabad police) फोन केला. डॉ. तोष्णीवाल यांच्या मते, प्राथमिक अंदाजानुसार त्यांच्या घरातून 50 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला.

कशी घडली घटना?

याविषयी हाती आलेल्या सविस्तर माहितीनुसार, सिडको एन-१ मधील काळा गणपती मंदिराच्या मागील सोसायटीत डॉ. संजय तोष्णीवाल राहतात. नेदरलँडमध्ये राहणाऱ्या नातेवाईकांकडे ते कार्यक्रमानिमित्त गेले होते. 26 मे रोजी नेदरलँडला गेलेले ते 31 मे रोजी भारतात आले. या दरम्यान त्यांच्या घरी झाडांना पाणी घालणारा येत होता. मात्र एक दिवस पाणी आले का , हे पाहण्यासाठी गेलेल्या शेजाऱ्यांना खिडकी उघडी दिसली व त्यातून बेडरुममधील सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. त्यांनी हा प्रकार तोष्णीवाल यांना कळवला. दुपारी दोन वाजता ते औरंगाबादेत आल्यानंतर पोलिसांनी घटनेची माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

दागिन्यांचा विमा काढलेला

बाहेरगावी जाताना नागरिकांनी पोलिसांना सूचना करून जावी, असे आवाहन पोलिसांकडून नेहमीच केले जाते. मात्र डॉ. तोष्णीवाल यांनी ही माहिती पोलिसांना दिली नव्हती. चोराने खिडकीची ग्रील काढून घरात प्रवेश केला. कपाटाचे लॉक तोडून सर्व ऐवज नेला. तसेच जाताना समोरस असलेल्या कॅमेऱ्यांचा डीव्हीआरही नेला. त्यानंतर खिडकीची ग्रिल जशासतशी लावली. तोष्णीवाल यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरात हिऱ्याचे व सोन्याचे दागिने होते. त्यापैकी काही बँकेच्या लॉकरमध्ये तर काही घरात होते. मात्र त्यांना नेमका अंदाज येत नव्हता. प्राथमिक अंदाजानुनसार, 45 लाखांचे दागिने व 10 लाखांच्या आसपास रोख रक्कम असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र घरातील दागिन्यांचा त्यांनी विमा काढलेला होता.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.