VIDEO | गंभीर… SSC Exam मध्ये Copy, बालभारतीचं गाईड घेऊन पळतोय शिक्षक, औरंगबाादच्या शाळेची मान्यता रद्द
औरंगाबादः बारावीच्या परीक्षा (HSC Exam) घेण्यासाठी शाळेने चक्क लग्न समारंभात टाकतात, तो मंडप टाकून व्यवस्था केली. या मंडपातच मुलांना परीक्षेला बसवलं. त्याच शाळेत दहावीचीही परीक्षा (SSC Exam) घेतली आणि त्यात तर मुलांना चक्क गाईडद्वारे कॉप्याही पुरवल्या. बारावीच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे मुलभूत सुविधांअभावी पेपर द्यावा लागला म्हणून शाळेची मान्यता रद्द का केली जाऊ नये, अशी नोटीस […]
औरंगाबादः बारावीच्या परीक्षा (HSC Exam) घेण्यासाठी शाळेने चक्क लग्न समारंभात टाकतात, तो मंडप टाकून व्यवस्था केली. या मंडपातच मुलांना परीक्षेला बसवलं. त्याच शाळेत दहावीचीही परीक्षा (SSC Exam) घेतली आणि त्यात तर मुलांना चक्क गाईडद्वारे कॉप्याही पुरवल्या. बारावीच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे मुलभूत सुविधांअभावी पेपर द्यावा लागला म्हणून शाळेची मान्यता रद्द का केली जाऊ नये, अशी नोटीस शिक्षण विभागाने (Education Department) दिली होती. मात्र दहावीच्या परीक्षेतही कॉप्या पुरवल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने शाळेची मान्यताच रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. . विशेष म्हणजे येथील कॉपीचे व्हिडिओ समोर आले असून शाळेतील शिक्षकांची विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचे त्यात दिसत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील निलजगाव इथल्या लक्ष्मीबाई माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतल्या या प्रकारावर शिक्षण विभागाने कारवाई केली आहे.
काय घडला नेमका प्रकार?
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या एका शाळेने लग्न समारंभातला मंडप टाकून मुलांना बारावीच्या परीक्षेला बसवले होते. पुन्हा त्याच शाळेत दहावीच्या परीक्षेसाठी शिक्षकच कॉपी पुरवत असल्याचं समोर आले. त्यामुळे त्या निलजगाव इथल्या लक्ष्मीबाई माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेची मान्यता रद्द करण्याचे शिक्षण विभागाने आदेश दिले आहेत. त्यासोबत दहावी परीक्षेसाठी असलेले केंद्र शनिवारपासून केंद्रही बदलण्यात आले आहेत.
VIDEO | गंभीर… SSC Exam मध्ये Copy, बालभारतीचं गाईड घेऊन पळतोय शिक्षक, पैठण तालुक्यातील निलजगाव इथल्या लक्ष्मीबाई माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेची मान्यता रद्द pic.twitter.com/C6UQFgkvFh
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 17, 2022
शाळेची मान्यता रद्द, विद्यार्थ्यांसाठी नवे केंद्र
दरम्यान, पैठणच्या लक्ष्मीबाई शाळेची मान्यता रद्द करण्यात आल्यानंतर शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी नव्या केंद्राची व्यवस्था केली आहे. आता दहावीचे पेपर हे बोकुड जळगाव येथील सुरेखा शंकरसिंग नाईक विद्यालयात होणार असल्याचे विभागीय शिक्षण मंडळाचे प्रभारी अध्यक्ष अनिल साबळे यांनी जाहीर केले आहे. यावर्षी प्रथम राज्यमंडळाने होम सेंटर दिले आहेत. याचाच गैरफायदा शाळा घेतांना दिसत असल्याचे चित्रही या परीक्षेदरम्यान दिसून आले आहे. बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला पैठण तालुक्यातील निलजगाव येथील लक्ष्मीबाई माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात भौतिक सुविधांचा अभाव आढळून आल्याने आणि मुलांना मंडपाखाली परीक्षेला बसवल्याने चुकीची माहिती दिल्या प्रकरणी तुमच्या शाळेची मान्यता का रद्द करण्यात येवू नये, अशी नोटीस शाळेला शिक्षण विभागाने बजावली होती. ते ताजे असताना दहावीच्या पेपर दिवशी ज्या विषयाचा पेपर आहे. त्या विषयाचे शिक्षक शाळेच्या परिसरात असता कामा नये, असा मंडळाचा नियम असतांना देखील मराठी विषयाचे शिक्षक शाळेत होते. बालभारतीची गाईड पळत घेवून जातांनाचे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आला. यामुळे आता थेट मान्यता रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
इतर बातम्या-