Electricity | वीज कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप, परळी औष्णिक विद्युत केंद्रासह, औरंगाबाद, परभणी, नांदेडमध्ये आंदोलन
दरम्यान, उन्हाळ्यातील वीजेची गरज, दहावी-बारावीच्या परीक्षा आणि पिकांना पाण्याची आवश्यकता या पार्श्वभूमीवर वीज ही अत्यावश्यक सेवांपैकी एक आहे. त्यामुळे नागरिकांचा खोळंबा झाल्यास आंदोलक कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिला आहे.
बीडः महाराष्ट्रातील महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण (MSEDCL) कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी देशव्यापी आंदोलन सुरु केले आहे. या कंपन्यांच्या खासगीकरणाला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथील औष्णिक वीज (Electricity) निर्मिती प्रकल्पातही कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. खासगीकरण रद्द करण्यासोबतच कर्मचाऱ्यांन इतरही मागण्यांचे निवेदन दिले आहे. जोपर्यंत शासन या मागण्या मार्गी लावणार नाही तोपर्यंत संप करण्याचा इशारा संपात सहभागी संघटनांकडून देण्यात आला आहे. परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रात आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, उन्हाळ्यातील वीजेची गरज, दहावी-बारावीच्या परीक्षा आणि पिकांना पाण्याची आवश्यकता या पार्श्वभूमीवर वीज ही अत्यावश्यक सेवांपैकी एक आहे. त्यामुळे नागरिकांचा खोळंबा झाल्यास आंदोलक कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिला आहे.
काय आहेत मागण्या?
परळी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण कंपन्यात करण्यात येत असलेले खाजगीकरण रद्द करा, विद्युत संशोधन बिल 2021 हे केंद्राने रद्द करावे, महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रातील जलविद्युत केंद्रांचे खाजगीकरण करण्यात येऊ नये, तिन्ही कंपन्यांतील कामगारांना वयाच्या 60 वर्षांपर्यंत नोकरीत संरक्षण द्यावे, तिन्ही कंपन्यांतील रिक्त पदभरती करण्यात दिरंगाई करू नये, तिन्ही कंपन्यांतील कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी यांच्या बदल्यांचा एकतर्फी निर्णय घेऊ नये, तिन्ही कंपन्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बादलीत राजकीय हस्तक्षेप करू नये आशा मागण्या संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत. या मागण्या न सोडवल्यास संप कायम ठेऊ असा इशारा देण्यात आला आहे.
औरंगाबाद, परभणी, नांदेडमध्येही आंदोलन
महाराष्ट्र राज्य वीज कर्मचाऱ्यांच्या वतीने आज औरंगाबाद येथे संप पुकारण्यात आला. या वेळी सर्व कर्मचारी महावितरण कार्यालया समोर धरणे धरून बसले आहेत. महावितरण महानिर्मिती आणि महापारेशन यांचे खाजगीकरणाविरुद्ध हा संप पुकारण्यात आला आहे. आज आणि उद्या असे दोन दिवस हा संप चालणार आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यास त्यांच्यावर मेस्मा नियमानुसार कारवाई केली जाईल असा इशारा सरकारच्या वतीने देण्यात आला आहे. नांदेड आणि परभणी येथील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला आहे.
इतर बातम्या-